मुंबई: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे महाराष्ट्रातील एका प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत. तो प्रकल्प सातारा जिल्ह्यातील आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणजेच जिहे कठापूर योजना (Jihe Kathapur Scheme) प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जिहे कटापूर योजनेचा एआयबीपी योजनेत समावेश करुन त्याला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या सोबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो ट्विट केला आहे. या नेत्यांनी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे-कठापूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केंद्रीय प्रकल्प म्हणून समावेश केल्याबद्दल तसेच यासाठी 247 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ यामुळे होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आमच्याच काळात पूर्ण झाला आणि त्यासाठी संपूर्ण निधी सुद्धा आमच्या सरकारने दिला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जिहे कठापूर योजना मार्गी लागावी म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या संसदीय समितीचे सदस्य म्हणून प्रयत्न केले आहेत. जिहे कठापूर योजनेमुळं 27 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्यांना लाभ मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Thank you Hon PM @narendramodi ji for making Guruvarya Late Laxmanrao ji Inamdar Lift Irrigation Scheme (Jihe Kathapur Lift Irrigation Scheme) as Central Govt project under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana (PMKSY) and sanctioning ₹247 crore as Central Govt share ! pic.twitter.com/ocb6xnTvfI
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 1, 2022
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि सदाभाऊ खोत यांनी ससंदेत नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. जिहे कठापूर योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट केल्याचं पत्र आजच राज्यसरकारच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आलं आहे.
वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय