मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. नारायण राणेंच्या अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या अटकेमुळं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे,
केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2021
शिवसेनेने हा तमाशा बंद करावा, भाजपच्या कार्यालयाजवळ जे तमाशे चालू झाले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल, त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी मविआ नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील.
नारायण राणेंच्या अटकेविरोधात केंद्रीय भाजपही आक्रमक झालं आहे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री विनोद तावडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. नारायण राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.
इतर बातम्या:
Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांकडून धक्काबुक्की :प्रसाद लाड
VIDEO : नारायण राणे यांना खरंच जेवणाच्या ताटवरुन उठवलं का? UNCUT व्हिडीओ पाहा!
Devendra Fadnavis slams MVA Government over arrest of Narayan Rane