राम मंदिर आंदोलनाचा जुना फोटो टि्वट करत देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांना दिले उत्तर

| Updated on: Jan 21, 2024 | 10:02 AM

Devendra Fadnavis bjp | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी ढाचा पडल्याचे खोचक उत्तर दिले. आता या वादात देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. राम मंदिर आंदोलनातील या फोटोत देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

राम मंदिर आंदोलनाचा जुना फोटो टि्वट करत देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांना दिले उत्तर
Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई, दि.21 जानेवारी 2024 | राम मंदिर आंदोलनात देशभरातून हजारो कारसेवक गेले होते. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात खंडाजंगी झाली होती. बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण कारसेवेला हजर होतो. परंतु शिवसेनेचे लोक कुठे दिसले नाहीत, अशी टीका केली होती. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी ढाचा पडल्याचे खोचक उत्तर दिले. आता या वादात देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. राम मंदिर आंदोलनातील या फोटोत देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

काय म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी

देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट करताना म्हटले की, जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली. तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

साधला विरोधकांवर निशाणा

राम मंदिर आंदोलनासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. बाबरीचा ढाचा पडत असताना आपण त्या ठिकाणी होतो. याचा आपणास अभिमान आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक कारसेवकांना अटक झाली होती. त्यात आपणही होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ते बदायू येतील तुरुंगात ठेवले होते. परंतु शिवसनेनेचे लोक दिसले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित हे छायाचित्र जारी करुन पुरावे मागणार्‍या उद्धव ठाकरे, संजय राऊतांची बोलती बंद केल्याचे बोलले जात आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले गाणे

श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिले आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. अमृता फडणवीस यांनी देखील गाणे गायले आहे. हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे.