मुंबई : कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन जागांबद्दल भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी वर्तवलेली एक अपेक्षा आणि रोहित पवारांनी वर्तवलेलं एक भाकीत सध्या चर्चेत आहे. नेमकं काय म्हणाले आहेत हे दोन्ही नेते. पाहूयात.
भाजपचे खासदार धनंजय महाडिकांचं विधान आणि आमदार रोहित पवारांचं भाकीत. या दोन्ही गोष्टींनी नव्या चर्चांची सुरुवात केलीय. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा आहेत. शिवसेना-भाजप युतीवेळी या दोन्ही जागा शिवसेना लढवत होती.
सध्याही कोल्हापुरात खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेचे आहेत, जे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटासोबत गेलेत. मात्र अमित शाहांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दोन्ही जागा भाजपनं लढवाव्यात अशी इच्छा असेल, असं खासदार धनंजय महाडिकांनी म्हटलंय.
युतीच्या वाट्यात कोल्हापूरच्या लोकसभा शिवसेनेकडे असल्यामुळे भाजपनं इथून लोकसभा लढवलेल्या नाहीत. या घडीला कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा एकही आमदार नाहीय. राधानगरीचे प्रकाश आबिटकरआणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावरकरही शिंदे गटात गेले आहेत..
कोल्हापुरात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेसकडे चार, राष्ट्रवादीकडे दोन, शिंदे गटात अपक्ष यड्रावकरांसहीत दोन, जनसुराज्य एक आणि अपक्षाला एक जागा आलीय. दुसरीकडे सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसल्याचं रोहित पवारांचं ट्विटही चर्चेत आहे.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्ष्यांचं वर्तन बदलतं, एक प्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचना असते. असंच माझं आज वेगळं एक निरीक्षण आहे. मुंबईत सत्ताधारी काही आमदारांची भेट झाली. त्या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लॅग्वेज पडलेली होती. विशिष्ट पक्षाच्याच फाईली मंजूर होत असून त्याचा वेगही वाढलाय. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?
रोहित पवारांच्या या ट्विटवर शिंदे गट आणि भाजपनं टीका केलीय. रोहित पवार मनकवडे आहेत का आमची मनं ओळखायला. त्यांनी आमच्या नव्हे त्यांच्या आमदारांची त्यांनी काळजी घ्यावी. आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा आत्ताचे मुख्यमंत्री पाहिले तर जवळपास 18 तास ते काम करतात. फाईल पेंडीग कुठं ही राहत नाहीं. अडीच वर्षांत जी कामे झाली नाहीत ती आता होतं आहेत. राज्य सरकारकडून मागचा महिन्या पर्यन्त नियमित पगार होतं होता.