मुंबई: सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. सफाई कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार आहे. (dhananjay munde increased scholarship for Cleaning Workers kids)
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवून आता प्रतिमहिना २२५ रुपये करण्यात आली आहे. तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढवून २२५ रुपये करण्यात आली आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अनुदान जैसे थे
वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७०० रुपये व वार्षिक अनुदान १००० रुपये या पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही या शासनानिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सफाईच्या क्षेत्रात व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात/धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. (dhananjay munde increased scholarship for Cleaning Workers kids)
LIVE : महत्तवाच्या घडामोडी https://t.co/wvUFqr3l28
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
संबंधित बातम्या:
वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस
‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार
वनमंत्री पदासाठी आता काँग्रेसचं लॉबिंग, मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी!
(dhananjay munde increased scholarship for Cleaning Workers kids)