मुंबई: दादरच्या इंदू मिलमधील (indu mill) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकर स्मारकाची डेडलाईनही दिली. 2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत या प्रकल्पावर 245 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी या वर्षी आपण या प्रकल्पासाठी ठेवला आहे. या प्रकल्पासाठी या वर्षी 300 कोटी रुपये खर्च झाला. त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकची वाट संपूर्ण देश पाहतोय, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मुंडे यांच्या सोबत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि या प्रकल्पाशी संबंधित अधिकारीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधितांना काही सूचनाही केल्या.
2016साली जेव्हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले तेव्हा याची किंमत सहाशे कोटी होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने पुढाकार येऊन हे काम केले आहे. 2023 अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या क्वार्टर मध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होईल. या कालावधीत स्मारकाचं लोकार्पण होईल अशा पद्धतीने आम्ही जलद गतीने काम सुरू ठेवले आहे. ज्या पिलरवर स्मारक होणार आहे, त्या पिलर्सचं काम 75 फुटापर्यंत पूर्ण झालं आहे. आणखी 25 फुटाचा काम बाकी आहे. स्मारकापर्यंत जाण्यासाठी किती प्रदक्षिणा घालायची आहे त्याचं स्ट्रक्चरचं काम बाकी आहे. एक हजार लोकांची क्षमता असलेल्या वातानुकूलित ऑडिटोरियमचं काम सुद्धा सुरू आहे. स्मारकाच्या खाली पार्किंगचा काम सुद्धा सुरू आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. आपण किती टक्के काम पूर्ण झालं हे आताच सांगता येणार नाही. पैशाची कुठलीही अडचण या कामासाठी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.