VIDEO: केपी गोसावींचा मनसुख हिरेन होऊ नये, नवाब मलिकांनी व्यक्त केली भीती

| Updated on: Oct 26, 2021 | 5:25 PM

क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील पंच केपी गोसावी याचा अजूनही शोध लागलेला नाही. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे. (did kiran gosavi become mansukh hiren doubts raised by nawab malik)

VIDEO: केपी गोसावींचा मनसुख हिरेन होऊ नये, नवाब मलिकांनी व्यक्त केली भीती
nawab malik
Follow us on

मुंबई: क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील पंच केपी गोसावी याचा अजूनही शोध लागलेला नाही. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे. केपी गोसावी यांचा मनसुख हिरेन होऊ नये, अशी भीतीच नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना केपी गोसावी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. काल मी एक गोष्ट सांगितली होती. मला भीती वाटते की उद्या के. पी गोसावीचा मनसुख हिरेन होऊ नये. जो आरोपी लपलेला होता, नंतर तो टीव्हीला फोन देऊ लागला. त्यामुळे त्याला कुठे तरी लपून ठेवलं होतं असं मला वाटतं. मनसुख हिरेनवाला आरोप लागल्याने तो बाहेर आला. तो बाहेर आल्याने पुणे पोलीस त्याच्या फोनला ट्रॅक करत असून त्याला अटक करेल, असं मला वाटतं, असं मलिक म्हणाले.

माझ्या मुलीचे सीडीआर मागितले

समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते. अशी माहिती देतानाच अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे, असे मलिक यांनी स्पष्ट बजावले. वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सीडीआरची मागणी केली होती. परंतु मुंबई पोलिसांनी एखाद्याच्या खाजगी जीवनाची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले. मात्र वानखेडे याने मुंबई आणि ठाण्यातील दोन खाजगी व्यक्ती फोन टॅपिगसाठी ठेवले असून त्या दोन व्यक्तींची नावे आणि पत्ता माझ्याजवळ आहे. आता ही लढाई खूप लांबवर चालणार असून या गोष्टी येत्या काळात समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

तो जन्मदाखला खराच

वानखेडे यांचा जन्मदाखला काल जाहीर केला तो खरा आहे. दाऊद के. वानखेडे त्याच्या वडिलांचे नाव आहे. त्या जन्मदाखल्यात काहीतरी बदल केलेला आहे. सध्या मुंबईत ऑनलाईन जन्मदाखले मिळतात. त्यांच्या बहिणीचा दाखला उपलब्ध आहे. मात्र समीर वानखेडे याचा जन्मदाखला उपलब्ध नाही. दीड महिने या कागदपत्राचा शोध घेतल्यावर तेव्हा कुठे हा दाखला उपलब्ध झाला आहे. ज्ञानेश्वर वानखेडे हे दलित आहेत. दलित आरक्षणावर त्यांनी अकोला नंतर वाशिम जिल्हा झाल्यावर जन्म दाखला घेऊन नोकरी केली. मुंबईमध्ये नोकरी करत असताना माझगाव घागरा बिल्डींग येथे टेन बंदररोडवर स्वर्गवासी खानजी यांच्या उपस्थितीत लग्न केले आणि दाऊद खान बनले. दोन मुलांचे वडील झाल्यावर ते मुसलमान पध्दतीने जीवन जगले. आप्टर थॉट करुन समीर वानखेडे याने वडिलांच्या दाखल्याचा आधार घेत आपला दाखला बनवला तो बोगस दाखला आहे. समीर वानखेडे याने अनुसूचित जातीच्या मुलाचा अधिकार हिरावून घेतला आहे. या सर्व प्रकरणाबाबत दलित संघटनांशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित बातम्या:

आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीश उठले; सर्वांनाच बाहेर काढलं

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु 

समीर वानखेडेंची चौकशी, साक्षीदाराचे आरोप; ज्येष्ठ वकील उज्जवल निकम म्हणतात…

(did kiran gosavi become mansukh hiren doubts raised by nawab malik)