काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Aug 15, 2021 | 12:28 PM

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपवर जोरदार निशाणा साधला. काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही. (dilip walse-patil slams bjp over 75th independence)

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण...; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा
dilip walse-patil
Follow us on

मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपवर जोरदार निशाणा साधला. काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही. परंतु, 75 वर्षात केलेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व आपल्या पूर्वजांनी जे काम केलेय त्याच पध्दतीने येत्या काळात आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी आज केले. (dilip walse-patil slams bjp over 75th independence)

देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आज उत्साहात साजरा करण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर मुंबई विभागीय कार्यालयात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर आदींसह पक्षाचे मुंबई व प्रदेशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप वळसे-पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपला टोलेही लगावले. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. या 75 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदोत व हे स्वातंत्र्य असेच तेवत राहो अशा शब्दात वळसे-पाटील यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

परिस्थिती बदलली आहे

यावेळी वळसे-पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना अभिवादन केलं. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. दीड वर्षात सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी आपत्तीवर मात करण्याचे काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे. पुढचा स्वातंत्र्य दिन आपल्याला यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तर लॉकडाऊन लावावं लागेल: मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मंत्रालयासमोर ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटापासून सावध राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं. कोरोनाचं संकट घोंघावतंय… आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय… आरोग्य सुविधा आपण वाढवतोय… शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत… ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. (dilip walse-patil slams bjp over 75th independence)

 

संबंधित बातम्या:

Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे

Mumbai Local | मुंबईकरांना लोकल’स्वातंत्र्य’, लसवंत प्रवाशांसाठी मुंबईची लाईफलाईन पुन्हा खुली

…तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्र्याचा जनतेला स्वातंत्र्यदिनी पुन्हा इशारा

(dilip walse-patil slams bjp over 75th independence)