‘आपलं परिवार कुठे? कोण जेलमध्ये?’, भर सभागृहात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी

| Updated on: Mar 08, 2023 | 8:33 PM

"ते विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते की, अशा तोडपाणी करणाऱ्या नालायक विरोधी पक्षाला मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं. असं ते बोलले होते की नाही? आज ते आपले नेते आहेत", असं गिरीश महाजन म्हणाले.

आपलं परिवार कुठे? कोण जेलमध्ये?, भर सभागृहात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी
Follow us on

मुंबई : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत ‘महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण विधेयक 2023’ हे विधेयक सादर केलं. या विधेयकाला विरोधकांकडून चांगलाच विरोध करण्यात आला. यावेळी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद होताना दिसला. “आपल्याकडे चार बोटे आहेत ना? आपण मुख्यमंत्री होता होता कुठे जाऊन बसलात? आपली पक्षातून हकालपट्टी का झाली याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपले काय हाल झाले आहेत, आपलं परिवार कुठे? कोण जेलमध्ये? कोण उंबरठ्यावर आहे?”, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला. त्यावर खडसे यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“कोरोना काळात अनेक जिल्हे असे आहेत की जिथे ऑक्सीमीटर, व्हेंटिलेटर घ्यावे लागले. त्यावेळी गरज होती. लोकांना झोपायला जागा नव्हती. त्यामुळे अनेक यंत्रसामग्री घेतल्या गेल्या. आता ते पडून आहे, असं म्हणतात. लोकांना सगळे साहित्य लागले आहेत का? तर नाही लागले. उगाच कुणावरही दोषारोप करायचा, आपले नेते शरद पवार हे या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत. ते विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते की, अशा तोडपाणी करणाऱ्या नालायक विरोधी पक्षाला मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं. असं ते बोलले होते की नाही? आज ते आपले नेते आहेत. आपण त्यांनाच विचारु की आपण असे का बोलले?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरेही बोलले होते की, असा चिंधीचोर विरोधी पक्षनेता मी पहिल्यांदा बघितला. बोलले नाही का? हा रेकॉर्ड आहे. आपल्याकडे चार बोटे आहेत ना? आपण मुख्यमंत्री होता होता कुठे जाऊन बसलात? आपली पक्षातून हकालपट्टी का झाली याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्यावर 50 खोके घेतल्याचं बोट दाखवून म्हणतात. ते कशासाठी म्हणतात? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोपांचे पुरावे आता द्या. तुमच्या शंभर गोष्टी आहेत. आपले काय हाल झाले आहेत, आपलं परिवार कुठे? कोण जेलमध्ये? कोण उंबरठ्यावर आहे? ते बघाना. तुम्हाला आमच्याबद्दल बोलताना वेळ आहे वाटतं. मगा आता का ऐकत नाही तुम्ही? तुम्ही गुलाबराव आणि माझ्याबद्दल बोलता, मग आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही का? हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

यावेळी सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी संबंधित वक्तव्ये कामाकाजातून काढून घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी उभं राहून भूमिका मांडली. “सभागृहामधील शब्द काढून टाकले असले तरी यूट्यूबवर दिसतात. वर्तमानपत्रातही ते छापून येतं. मी बाहेर बोललो होतो. माझ्यामागे ईडी लावायचे, परिवाराचे विषय इथे काढण्यासारखे नाही. मला पण काढता येतील”, असं एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी वाद मिटवला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस २०१६ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस तामिळनाडूच्या धर्तीवर औषध खरेदी महामंडळ असावं, अशा प्रकारचं सरकारच्या वतीने ठरविण्यात आलं होतं. त्यावेळी औषध खरेदीवेळी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली. याबद्दलचा आवाज उठवत होता त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर औषध खरेदीचा निर्णय घेतला. पण नंतर कुठे माशी शिंकली माहिती नाही. या सगळ्या खरेदीचं काम हाफकिन संस्थेकडे दिली.

हाफकिन संस्था गौरवशालीच आहे. पण तिथे काम करणारे सगळेच चांगले आहेत, असंही नाही. नाहीतर आपल्याला काढून घेण्याची वेळच आली नसती. हाफकीन संस्था चांगली आहे. पण त्यातील काही माणसं, त्यांनी जाणीवपूर्वक उशिक केला का? असा प्रश्न आहे. रुग्णालयांचे डीन सांगायचे आम्ही हाफकिनला ऑर्डर दिली अशी सांगायचे. पण हाफकिन काम करत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हाफकिनचं काम प्रशिक्षण आणि संशोधनाचं असताना आपण त्यांना कामच चुकीचं दिलेलं होतं.

विरोधकांच्या मुद्द्यावर गिरीश महाजन काय म्हणाले?

प्राधिकार करण्याची आवश्यकता का पडली? यापूर्वी हाफकिनबद्दल सर्वच सदस्य बोलले आहेत. हाफकिनचं मूळ काम रिसर्च, डेव्हलोपमेंट आणि संसोधनाचं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ही संस्था काम करतेय. देशभरात नावाजलेली ती संस्था आहे. हाफकिनकडे खरेदी करण्याचं काम का आलं? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण राज्यात औषधांच्या किंमतीत सूसूत्रता नव्हती. एकाच औषधांच्या वेगवेगळ्या किंमती होत्या. एकीकडे शंभर रुपये तर दुसरीकडे ४०० रुपये होते. त्यामुळे या संदर्भात कोर्टात PIL झाली.

कोर्टाने तामिळनाडूच्या धर्तीवर केंद्रीय पद्धतीने खरेदी करावी, असा आदेश दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हाफकिनकडे खरेदी विभाग द्यावा. तिथे वेगळी माणसं द्यावीत आणि खरेदी करावी. अन्यथा त्यांनी खरेदी करण्याचा संबंधच नाही. कारण त्यांचं हे कामच नाहीय. त्यांचं काम फक्त संशोधनाचं आहे. काम दिल्यानंतर काम सुरु झालं. त्यावेळी त्यांच्याकडे मनुष्यबळ पूर्ण नव्हतं. त्यामुळे ताणाताण झाली. टेंडर प्रोसेस नीट झाली नाही. बारा महिन्यात दहा एमडी बदलले. पोस्टिंग दिली की सुट्ट्या टाकून जातात.

पैसे दिल्यावर सुद्धा खरेदी प्रोसेस होत नाही ही वस्तुस्थिती आहे. वेगवेगळ्या विभागांचा बजेट वेगळा आहे. संस्था जी मागणी करेल तेच औषध त्यांना टेंडर केलं जाईल. जशाप्रमाने साठा लागेल तसा पुरवठा केला जाईल. सजमा जे जे रुग्णालयाला औषधांचे 100 खोके लागतील तर त्यांना तितके खोके दिले जातील.

यावेळी खोके खोके असं विरोधक बोलू लागले. त्यानंतर गिरीश महाजन यांनी बॉक्स असा शब्दप्रयोग केला. त्यानंतर गिरीश महाजन पुन्हा बोलू लागले.

“साडेचार हजार आपण भरणार आहोत. हे विधेयक अतिशय महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने आहे. या विषयावर चर्चा करताना वेगवेगळ्या विषयांना फाटे फुटले. पण कुणी कुणाबद्दल काय बोलावं? मला कळत नाही. विधेयकावर चांगली चर्चा सुरु असताना विषयांतर करावं आणि काहीही आरोप करावेत. हवेत आरोप केले जातात. विषयांतर करुन उगाच 50 लाख घेतले असे आरोप करायचे”, असं गिरीश महाजन म्हणाले.