मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर वाद पेटला, ‘माफी मागा, अन्यथा…’ शिवसेनेचा इशारा

| Updated on: Nov 03, 2024 | 11:31 AM

ulhasnagar shiv sena and bjp: उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर वाद पेटला, माफी मागा, अन्यथा... शिवसेनेचा इशारा
Eknath Shinde
Follow us on

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा टप्पा महत्वाचा वळणावर आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी जागा अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. परंतु त्यापूर्वीच महायुतीमधील वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्याने वक्तव्य केले आहे. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने “माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही!”, असा सरळ इशारा दिला आहे. उल्हासनगर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे.

नेमका वाद कशामुळे

प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटले होते की, ज्यांना गद्दार म्हटले जाते ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची व्याख्या बदलली आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते आमच्या पक्षात आले आहेत, असे आम्ही अभिमानानेच म्हणू.

भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक

उल्हासनगरचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर उल्हासनगरमधील शिवसैनिक आक्रमक झाली आहेत. जोपर्यंत जिल्हाध्यक्ष रामचंदानी हे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचे काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आमदार कुमार आयलानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

माहीम मतदार संघातही वाद

राज्यातील महायुतीमधील जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत सुरु होता. काही मतदार संघातील वाद मिटत नव्हता. मुंबईतील माहीम मतदार संघाचा वाद सुरु आहे. या मतदार संघात शिवसेनेने माघार घ्यावी, अशी अपेक्षा भाजपची आहे. या ठिकाणी मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक मैदानात आहे. त्यांना पाठिंबा देण्याची मागणी भाजप करत आहे. परंतु शिवसेनेचा त्याला विरोध आहे. त्यानंतर आता उल्हासनगरमध्येही वाद सुरु झाला आहे.