मुंबई: नागपूरच्या गोरेवाडा राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. त्याला भाजपने विरोध केला आहे. तर बाळासाहेब ठाकरेंनी स्वतंत्र विदर्भाच्या निर्मिताला विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांचं नाव देऊ नका, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे. या निमित्ताने ठाकरे घराण्याचा विदर्भाशी संबंध काय? असा सवालही केला जात आहे. त्याचा घेतलेला हा आढावा. (do you know thackeray familys vidarbha connection?)
फडणवीस काय म्हणाले होते?
ठाकरे सरकारने गोरेवाडा उद्यानाचं नाव बदलल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. बाळासाहेबांचं नेमकं किती जागांना नाव द्यायचं हे एकदा ठाकरे सरकारनं ठरवावं. आमचा बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही. गोरेवाडा प्राणी संग्रहालय हे गोंडवनाचा भाग आहे. तिथल्या गोंड समाजाची आदिवासींची मागणी होती, म्हणून या उद्यानाला गोंडवाना प्राणी संग्रहालय नाव देण्यात आलं. ते नाव ठाकरे सरकारनं बदललं आहे, असं फडणवीस म्हणाले. जिथे वाद होईल अशा ठिकाणांना ठाकरे सरकारने बाळासाहेबांचं नाव देऊ नये. जे निर्विवाद आहे, तिथेच बाळासाहेबांचं नाव द्यावं, असा सल्ला देतानाच बाळासाहेब मोठे होते. पण प्रत्येक गोष्टीला त्यांचं नाव दिल्याने ते मोठे होतील असं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला होता.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
या उद्यानाचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले होते. आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचं रक्त आहे. त्यामुळे विदर्भाचं प्रेम आम्हाला कोणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं विदर्भाशी रक्ताचं नातं असून सर्वच नाती पुढे घेऊन आम्ही जात आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं होतं.
ठाकरे घराण्याचं विदर्भाशी नातं कसं?
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे उद्धव ठाकरे यांचं आजोळ आहे. परतवाड्यातील त्यांच्या घराचं नाव किराड-वाडा असं होतं. तेथील चाळ ठाकरे कुटुंबाने भाड्याने दिली होती. या छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे, त्यांची पत्नी रमाबाई आणि बाळासाहेब ठाकरे वास्तव्याला होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2004मध्ये विदर्भ दौऱ्यावर असताना या वाड्याला भेट दिली होती. ही वास्तू जपण्याचा संकल्पही त्यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी या वाड्याला भेट दिली होती. एवढेच नव्हे तर प्रबोधनकारांचं वास्तव्य असलेल्या या वाड्याला स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भेट दिली होती. (do you know thackeray familys vidarbha connection?)
काय आहे उद्यान
नागपूरमध्ये 1 हजार 941 हेक्टर परिसरात हे गोरेवाडा प्राणी उद्यान आहे. हे उद्यान नागपूर शहरापासून 6 किलोमीटर परिसरात आहे. या उद्यानाला आदिवासी समाजाने गोंडवाना नाव देण्याची मागणी केली होती. त्याला सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र, ठाकरे सरकारने या उद्यानाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्राणी उद्यान असं नाव देण्यात आलं आहे. (do you know thackeray familys vidarbha connection?)
VIDEO: Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 27 January 2021https://t.co/3oboAE50Qj#Headlines
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021
संबंधित बातम्या:
…तर मी राजीनामा दिला असता, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं
गिरीश महाजन दुसऱ्यांदा अण्णा हजारे यांच्या भेटीला, भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु
भाजपचा एक गट घुसल्यानं शेतकरी आंदोलन हिंसक; संजय राऊतांचा गंभीर आरोप
(do you know thackeray familys vidarbha connection?)