मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (वय ८४) यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. मराठी दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक म्हणून विश्वास मेहेंदळे यांनी ओळख मिळवली होती. डॉ. मेहेंदळे यांनी महाराष्ट्र सरकारसाठीही काम केले होते.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक ते होते. तसेच मराठी बातम्या दिल्ली आकाशवाणीवरुन वाचणारे ते पहिले वृत्तनिवेदक होते.
दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक :
विश्वास मेहेंदळे यांनी पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम सुरू केले. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली. सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक होते. मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. त्यांनी काही गाजलेल्या नाटकांमध्येही काम केलं होते. रंगभूमीवरचा त्यांचा वावर वाखाणण्याजोगा होता.
त्यांनी 18 हून अधिक पुस्तकांचे लेखण केलं आहे.