मुंबई: कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. मात्र कोरोनाची ही साखळी 30 एप्रिलपर्यंत तोडली जाऊ शकते. त्यासाठी मिनी लॉकाडऊन किंवा कडक निर्बंध लावायला हवेत, असं राज्य कोव्हिड टास्क फोर्स’ चे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं. रुग्ण सेवेवर ताण येत असेल तर कठोर निर्बंध लावायलाच हवेत असंही त्यांनी सांगितलं. (dr. avinash supe on second wave of corona)
‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना डॉ. अविनाश सुपे यांनी ही माहिती दिली. आता कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. रेल्वे प्रवासातही बदल करण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ट्रेंड पाहता मृत्यू दर कमी आहेत. पण मृत्यू दर वाढू शकतो. राज्यातील काही भागात मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. काहीच भागात मृत्यूचं प्रमाण अधिक का आहे? याचा आम्ही अभ्यास करत आहोत, असं सुपे यांनी सांगितलं.
मृत्यू आणि लसचा काहीही संबंध नाही
प्रत्येकाने कोरोनाची लस घेणं गरजेचं आहे. राज्यात 65 लाख लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. लस घेताना ज्यांना व्याधी आहेत, त्यांनी त्या डॉक्टरांना सांगाव्यात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस घ्यावी. लस घेतल्यावर थोडा ताप, अॅलर्जी, पहिल्या दिवशी हात दुखणे आणि दुसऱ्या दिवशी ताप येणे आदी प्रकार होतात. काहींना भोवळ येते. काहींचा मृत्यूही झाला आहे. पण त्याचा लसीशी काहीच संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. लस सुरक्षित असून त्याचे दोन डोस घेणे गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
30 टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची शक्यता
आपल्या लस या कोरोनाच्या नव्या ट्रेंडसाठी उपयुक्त आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नाही. 30 टक्के लोकांना लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता आहे. पण क्षमता कमी असते, असं ते म्हणाले. गेल्यावर्षीचा कोरोनाच ट्रेंड वेगळा होता. आताचा वेगळा आहे. सध्या सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत. सध्याचा मृत्यूदर कमी आहे ही चांगली बाब आहे. रुग्णांची संख्या वाढत असून ही काळजी करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने निर्बंधांचं पालन केलं असतं तर ही वेळ आली नसती, असं सांगतानाच सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोना वाढतोय
मुंबईतील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस बिघडत आहे. मुंबईत काल दिवसभरात 8 हजार 832 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 352 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 46 दिवसांवर आला आहे. 26 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.46 टक्के झाला आहे. (dr. avinash supe on second wave of corona)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 April 2021https://t.co/x62wzAztBy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे
मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
(dr. avinash supe on second wave of corona)