मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised by unidentified persons)
दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
Mumbai: Premises of Dr BR Ambedkar’s house ‘Rajgruha’ was vandalised by unidentified persons, earlier today. CCTV cameras were also damaged. Police at the spot. #Maharashtra pic.twitter.com/mV7uuDCFCv
— ANI (@ANI) July 7, 2020
राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व
दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.
दरम्यान, “राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी. pic.twitter.com/P31MTvJhb4
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 7, 2020
पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
दादर येथील ‘राजगृह’ या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 7, 2020
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध केला.
दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘राजगृह’ येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध. @AnilDeshmukhNCP
— Supriya Sule (@supriya_sule) July 7, 2020
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. घटनेची सखोल चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती त्यांनी गृहमंत्र्यांना केली.
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे.
बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.
आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती
सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 7, 2020
माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गृहमंत्र्यांना केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. @AnilDeshmukhNCP यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी ! जय भीम !
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 7, 2020
भीमराव (दादासाहेब) आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे.
मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच…
(1/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2020
विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही घटनेचा निषेध नोंदवला.
विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृह यावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो.
राजगृह हे सर्वांचा प्रेरणास्थान आहे अश्या प्रेरणास्थान ची तोडफोड करणार्या ला तत्काळ अटक करावी व कडक कारवाई करावी.#rajgruh
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 7, 2020
हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
(Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised by unidentified persons)
VIDEO :