मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत

| Updated on: Sep 25, 2024 | 9:58 PM

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे, अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका, मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत
Follow us on

मुबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला बसला आहे. कारण दोन्ही वाहतूक विस्कळीत झाल्या आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धातास उशिराने धावत आहे. विजांच्या कडकडाट अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडून मुंबईला येणारे विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कुर्ला स्टेशन परिसरात ट्रॅकवर पाणी साचायला सुरवात झाली आहे.

मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे उद्या शाळांना उद्या  सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे.

वसई विरार नालासोप-यात मागच्या दीड तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वसई तील मुख्य रस्ते गेले पाण्याखाली गेले आहेत. वसई पश्चिम अंबाडी रोड, शंभरफुटी रोड, सिक्सिफिट रोड, दिवानमान, समता नगर, चुळणे, वसई पूर्व एवर्षाइन, नवजीवन, वालीव, सातीवली, नालासोपारा पूर्व चंदन नाका, आचोला रोड, नागिनादास पाडा, विजय नगर, नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ, पाटणकरपार्क, विरार पश्चिम विवा कॉलेज रोड, जकात नका, विरार पूर्व विवा जांगिड परिसरात पाणी साचले आहे.