मुंबई : महाराष्ट्रातील डॉक्टरांना कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यश मिळताना (Kasturba Hospital Corona Patient Discharge) दिसत आहे. कारण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चौघांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या आठही रुग्णांना पुढचे 14 होम क्लारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे (Kasturba Hospital Corona Patient Discharge).
कस्तुरबा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या आठ जणांचा रिपोर्ट दोन वेळा निगेटीव्ह आला. त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कस्तूरबा रुग्णालयात आतापर्यंत बाह्य विभागात तपासणी केलेल्यांची संख्या 6079 इतकी आहे. यापैकी 1304 संशयित रुग्णांना भर्ती करण्यात आलं. यामध्ये मुंबईतील 41 रुग्ण तर मुंबई बाहेरील 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण 58 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यांच्यावरल सध्या उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी
महाराष्ट्रातील डॉक्टरांना कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण काल पुण्यातील कोरोनाबाधित पहिलं दाम्पत्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचादुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील तब्बल १२ रुग्ण हे कोरोना विषाणूमुक्त झाले असं म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत.
पुण्यातील दाम्पत्य ठणठणीत
कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी (Pune Corona Patient) महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे (Pune Corona Patient). याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
संबंधित बातमी : महाराष्ट्राला दुसरं मोठं यश, मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त, महापालिकेच्या डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी