Eknath Shinde on CM post offer : एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडल आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंनी एका नवा खुलासा केलाय. बंडाच्या वेळी आपण वसईतल्या चहाच्या टपरीवरुन ठाकरेंना कॉल केला. त्यावेळी त्यांनी दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारल्याचं शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरुन गौप्यस्फोटही केला. बंडाची कहानीही सांगितली. सूरतला जात असतानाच, वसईतून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. पण उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारल्याचं शिंदेंनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितलं आहे.
आमचं षडयंत्र नाही तर बंड आहे, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळीच विधान भवनातच आमचं नियोजन झालं. सर्व आमदारांना राऊतांना मतदान करु दिलं आणि सूरतला रवाना झालो, आम्ही राऊतांना पराभूत करु शकलो असतो पण तसं केलं नाही. सूरतला जाताना वसईतील एका चहाच्या टपरीवरुन मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं.
मी ठाकरेंना नकार दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांना फोन केला आणि सरकार स्थापन करु, शिंदेंसोबत काय जाता असं म्हटलं. पण दिल्लीतूनही त्यांना आता उशीर झाला असं सांगण्यात आलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच होतं, पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहायचं हे त्यांचं स्वप्न होतं म्हणूनच 2019च्या निकालानंतर निकालानंतर सर्व पर्याय खुले आहेत ते त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी होत असताना उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे, माझ्या पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरेंच म्हणालेत शरद पवारांनी सांगितलं की, उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्याचवेळी शरद पवारांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंनीच त्यांचं नाव सूचवण्यासाठी काही माणसं पाठवली.
उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे माणसं पाठवून, स्वत:चं नाव सूचवलं, असा आरोप शिंदेंनी केला. मात्र स्वत: पवारांनी आपणच ठाकरेंचं नाव पुढं केल्याचं याआधी सांगितलंय.
काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनीही शिंदे चुकीचं बोलत असून आपण त्या बैठकीतला साक्षीदार असून सरकार टिकावं म्हणून शरद पवारांनी स्वत:हून उद्धव ठाकरेंचं नाव पुढं केल्याचं म्हटलंय. तर शिंदेंचे मंत्री उदय सामंतांनी मुख्यमंत्री अगदी खरं बोलत असल्याचं म्हणत आहेत.
शिंदेंच्या बंडाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आतापर्यंत फडणवीसांसह गिरीश महाजन, दरेकरांनाही अटक करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीत सुरु होतं, असे आरोप किंवा दावे समोर आलेले आहेत. पण बंडाच्या वेळी अर्ध्या रस्त्यातून उद्धव ठाकरेंना फोन केला होता, आणि त्यांची सीएम पदाची ऑफर नाकारली. हे नव्यानं शिंदेंनी समोर आणलं आहे.