shivsena dasara melava: शिवसेनेने दसरा मेळाव्याचे स्थळ अचानक बदलले, आता मेळावा या ठिकाणी होणार

| Updated on: Oct 10, 2024 | 11:13 AM

shivsena dasara melava 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. पहिला दसरा मेळावा हा बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर झाला होता. दुसरा मिळावा हा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदाच्या तिसरा मेळावा हा सुद्धा आझाद मैदानावर होत आहे.

shivsena dasara melava: शिवसेनेने दसरा मेळाव्याचे स्थळ अचानक बदलले, आता मेळावा या ठिकाणी होणार
shivsena dasara melava (file Photo)
Follow us on

shivsena dasara melava 2024: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. त्यानंतर दरवर्षी दसरा मेळावा होत असतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठाकडून वेगवेगळे दसरा मेळाव्या घेतले जातात. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होतो. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर होतो. यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसऱ्या मेळाव्याचे स्थान बदलले आहे. आता हा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. गवत कापून मैदान साफ करण्याचे काम जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणण्यात आलेल्या आहेत.

का बदलले मैदान

बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राउंडमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार होता. पण ट्रॅफिकची समस्या उद्भवत असल्याने वाहतूक व्यवस्था लक्षात घेता अचानक हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानात मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा तिसरा मेळावा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. पहिला दसरा मेळावा हा बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर झाला होता. दुसरा मिळावा हा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदाच्या तिसरा मेळावा हा सुद्धा आझाद मैदानावर होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना मोठमोठे खुलासे , दावे, आश्वासन त्यासोबतच इतर पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश करून विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मेळाव्याची जोरदार तयारी केली जात आहे.