मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज टीव्ही ९ मराठीला स्फोटक मुलाखत दिली. शुक्रवारी मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांना राजकीय परिस्थिती माहितीये. आमचा संवाद ही इतका चांगला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोकांनी याचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. इशारा हा व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. सरकार व्यवस्थित चालले आहे. अनेक आव्हाने आहेत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे.
अजित पवार आमच्यासोबत शंभर टक्के कन्फर्टेबल आहेत. सरकार स्थिर होतं. राजकारणात शक्ती वाढवावी लागते. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत २०१९ ला ही येणार होती. त्यांना आमच्यासोबत यायचं होतं.
एकनाथ शिंदे डिस्कॉलीफाय होतच नाही. ते झाले तरी देखील विधानपरिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही. उद्धव ठाकरे हे उर्वरित पक्ष वाचवण्यासाठी ते लोकांना आशा दाखवत आहेत. हे सरकार पूर्णवेळ चालणार आहे. बी प्लानची गरज नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील.
अजित दादांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यांना आधीच सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. अजित दादा हे मॅच्युअर राजकारणी आहेत.
राष्ट्रवादीचे जी लोकं आले आहेत त्यांच्यावर कुठलीही चौकशी नाहीये. उद्धव ठाकरे सरकार इतके नाकर्ते होते की त्यांना माहित होतं आपण परत निवडून येणार नाही. त्यामुळे ते आमच्यासोबत आले.
सदावर्ते हा फडणवीसाचा माणूस आहे असा आरोप होतो. शरद पवार यांची वाचलेली राष्ट्रवादी हा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते. मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिले होतं. ते वैध उच्चन्यायालयाने ठरवलं होतं. सदावर्ते म्हणाले होते की, फडणवीस यांच्याकडून मला धोका आहे. फडणवीस कोर्टावर दबाव टाकतात. असं ते म्हणतात. अनेक आरोप त्यांनी माझ्यावर केलेत. संघाच्या विरोधात बोलले. सातत्याने त्यांच्या भूमिका बदलतात. मी त्यांना फक्त दोन वेळा भेटलोय.