उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. ते म्हणाले की, मी नाराज नाही. मी माझी भूमिका आधीच जाहीर केली होती. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे. या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या अडीत वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरुन पाठबळ दिलं. यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो. अमित शाह यांना ही धन्यवाद देतो. कारण ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून गेल्या अडीच वर्षाचं कार्यकाळ यशस्वी झाला. इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं.’
एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आम्ही ४० आमदार होतो. या निवडणुकीत आता ६० झालो. ही कामाची पोहोचपावती आहे. याचा अभिमान आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं. मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो. आता डीसीएम झालो- डेडीकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईल. मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल अशी भावना व्यक्त करतो.’
‘लोकं म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे. पण जनतेने आमच्या सरकारवर मोहर लावली आहे. मी नाराज होतो हे कोणी सांगितलं. मी २७ तारखेलाच भूमिका जाहीर केली होती. गावी गेलो तरी नाराज, तब्येत खराब असली तरी नाराज आहे असे म्हणता. मी कामाला महत्त्व देतो. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ दिला पाहिजे. अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’
‘बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं. त्यांनी विकासाला साथ द्यावी. श्रीकांत शिंदे यांचा उपमुख्यमत्री बनवण्याचा संबंध काय आहे. तो राज्यामध्ये नाहीये. चिंता करु नका. सगळं तुम्हाला कळेल. ‘