पालघर : अकरावीत शिकणाऱ्या वसईतील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Student Commits Suicide). आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जित असर असं आहे. जितला त्याच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यींनी व्हॉट्सअॅप आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आत्महत्या करणारा विद्यार्थी जित असर हा सांताक्रूझ येथील रहेजा कॉलेजमध्ये बीएममच्या प्रथम वर्षात शिकत होता. महाशिवरात्रीच्या दिवशी राहत्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली (Student Commits Suicide). आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी मुलाच्या मोबाईलमधील वॉट्सअप बघितलं. यावेळी व्हॉट्सअॅपमधील एका गृपमध्ये जितला मित्रांकडून चिडवलं गेल्याचं त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे जितला गृपमधील मित्रांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
जितच्या मित्राने ‘नमुने’ नावाचा व्हॉट्सअॅप गृप बनविला आहे. त्यात मस्करीत जितला सर्वजन चिडवत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आता याप्रकरणी पोलीस तपास घेत असून जितने नेमकं कशामुळे आत्महत्या केली? ही बाब लवकरच उघडकीस येईल.