पुणे, मुंबईत पाणी का तुंबते, कोणीही आले तरी काहीच…अजित पवार यांनी रोखठोक सांगितले

| Updated on: Aug 15, 2024 | 6:11 PM

Exclusive interview with Ajit Pawar: विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही शहरे पाण्यात बुडाले. या सर्वांनी टॉप अधिकाऱ्यांसोबत पावसाळ्यात तुंबणारे पावसाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

पुणे, मुंबईत पाणी का तुंबते, कोणीही आले तरी काहीच...अजित पवार यांनी रोखठोक सांगितले
अजित पवार
Follow us on

पुणे आणि मुंबई शहरात तुंबण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढत आहे. कारण या शहरांची रचना त्याला कारणीभूत आहे. पुणे शहर कपबशीप्रमाणे आहे. पुणे शहरातील धरणे वरती आणि शहर खाली आहे. दोन्ही ठिकाणी यंदा खूप पाऊस झाला. यामुळे पुणे शहर पाण्यात बुडाले. तसेच मुंबईसुद्धा सात बेटांचे शहर आहे. या दोन्ही शहरांमध्ये पाणी तुंबणे रोखण्यासाठी आतापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही शहरे पाण्यात बुडाले. या सर्वांनी टॉप अधिकाऱ्यांसोबत पावसाळ्यात तुंबणारे पावसाच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक देशांचे दौरे केले. अभ्यास केला. परंतु आपल्या शहरांची रचना, भौगलिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे. यामुळे कोणीही आले तरी हा प्रश्न सोडवू शकला नाही. आता पुन्हा सिंगापूरचा अभ्यास करण्यासाठी पथक पाठवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

एएनआयसाठी स्मिता प्रकाश प्रकाश यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे आणि मुंबईत तुंबणारे पाण्यासंदर्भात भौगलिक परिस्थिती दाखवली. या शहरांची ही समस्या इरिगेशनमध्ये काम करणारे लोक किंवा तांत्रिक अभ्यास करणारे लोकांना समजू शकते. आपण स्वत: चांगल्या टेक्निशियनकडून हे सर्व समजून घेतले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवार तरुणांसोबत काम करतात

प्रत्येकाचा स्टाईल वेगळी असते. सेम टू सेम राजकारण कधी कुणी करत नाही. जनरेशन गॅप असतो. जुन्या पिढीतील लोक वेगळा विचार करतात. आताच्या पिढीचे लोक वेगळा विचार करतात. दर वीस वर्षाने नवीन पिढी येते. आता सोशल मीडिया आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या हिशोबाने काम करतो. तसंच सुप्रिया सुळेही त्यांच्या हिशोबाने राजकारण करत आहेत. शरद पवार तरुणांना सोबत घेऊन चर्चा करतात. त्यांच्यासोबत स्वत:ला जमवून घेतात.

हे सुद्धा वाचा

विरोधकांना उत्तर देणार नाही

निवडणुकीनंतर मी खूप विचार केला. सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली. ज्यांच्याशी राजकारणाशी संबंध नाही, त्यांच्याशीही चर्चा केली. सर्वसामान्य व्यक्तींशी चर्चा केली. सर्व चर्चा केल्यानंतर माझ्या मनात जे आले ते मी सांगितलं. लोकसभा निवडणूक पराभूत होण्याची कारणे सांगितली. आता जन्म सन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा बाहेर पडलो, आता मी एक ठरवले आहे, आजपासून मतदान होईपर्यंत विकासावरच बोलायचे आहे. विरोधकांनी काय म्हटले तरी त्याला उत्तर देणार नाही.