ठाकरे सरकारच्या काळात उद्योग, व्यापाराला घरघर ? निर्यात 4 टक्क्यांनी घसरल्याचा अतुल भातखळकरांचा दावा

| Updated on: Sep 16, 2021 | 6:52 PM

देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी 24 टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या 2020-20 या वर्षी तब्बल 4 टक्क्यांनी कमी झाला आहे, असा दावा भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

ठाकरे सरकारच्या काळात उद्योग, व्यापाराला घरघर ? निर्यात 4 टक्क्यांनी घसरल्याचा अतुल भातखळकरांचा दावा
Atul-Bhatkhalkar-Uddhav-Thackeray
Follow us on

मुंबई : देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी 24 टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या 2020-21 या वर्षी तब्बल 4 टक्क्यांनी कमी झाला आहे, असा दावा भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर  (Atul Bhatkhalkar )यांनी केला. कोविडच्या काळातही संपूर्ण देशांची निर्यात वाढत असताना महाराष्ट्राचा वाटा मात्र कमी होणे हे दुर्दैवी असल्याचंही भातळखर यांनी म्हटलंय. (exports rate decrease in maharashtra in 2021 claims bjp leader atul bhatkhalkar criticizes uddhav thackeray)

राज्यातील उद्योग विरोधी वातावरणाचा हा ढळढळीत पुरावा

यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या एकूण निर्यातीत यापूर्वी महाराष्ट्राची निर्यात 24 टक्के होती. आता याच निर्यातीचे प्रामाण वीस टक्क्यांवर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा व राज्यातील उद्योग विरोधी वातावरणाचा हा ढळढळीत पुरावा आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. एवढेच नव्हे तर नीती आयोगाकडून जाहीर केलेल्या एक्सपोर्ट प्रीपेडनेस इंडेक्समध्येही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर घसरल्याचंही भातखळकर म्हणाले.

ठाकरे सरकार सुस्त बसले आहे

“राज्याची उत्पादन क्षमता वाढावी व उद्योगाचे विकेंद्रीकरण व्हावे याकरिता केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या एक जिल्हा एक उत्पादनातही महाराष्ट्र दुर्दैवाने पिछाडीवर पडला आहे. राज्यातील धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, गडचिरोली व हिंगोली यासारख्या जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात नाहीत, हेच या आकडेवारीतून दिसतंय. देशातील अनेक राज्यांनी या योजनेसाठी विशेष यंत्रणा व वेबसाईट सुरु केलेली असताना ठाकरे सरकार या विषयात सुस्त बसले आहे,” असा घणाघात भातखळकर यांनी केला.

मसोर आलेली आकडेवारी चिंतेची बाब

तसेच “जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्याचे जीएसटी संकलन 3728 कोटी रुपयांनी कमी झाले. तसेच टेस्लासारख्या कंपन्याही महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. आता तर निर्यातीतही महाराष्ट्र पिछाडीवर गेल्याची आकडेवारी समोर येणे ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. किमान आता तरी उद्योग विभागाने ‘भूषणावह उद्योग’ सोडून या क्षेत्राच्या वाढीसाठी उपाययोजना कराव्या, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला सुनावले.

इतर बातम्या :

गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल पण दबदबा ओबीसी मंत्र्यांचा? वाचा पटेल मंत्रीमंडळाचं जातीनिहाय समीकरण?

चंद्रपुरात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का!, वरोरा नगर परिषदेच्या 7 नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान, विविध सेवा कार्यक्रमांचं आयोजन

(exports rate decrease in maharashtra in 2021 claims bjp leader atul bhatkhalkar criticizes uddhav thackeray)