मुंबई: देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिला.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे आरोप खोडून काढतानाच त्यांना सूचक इशाराही दिला. फडणवीस बिना पुराव्याचा आरोप करत नाही. आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसांना मागे घ्यावा लागला नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत त्यांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्जबाबतही बोलू नये, असा इशाराच फडणवीसांनी दिला.
आपल्या जावयाची चार्जशीट विक व्हावी आणि कोणत्या परिस्थितीत एनसीबीने आपल्या जावयाला या संपूर्ण प्रकरणातून सुटण्यासाठी मदत करावी या करिता हे प्रयत्न सुरू आहेत. पण मला वाटतं कायदा सक्षम आहे, असं ते म्हणाले. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत हे मी दिवाळीनंतर जाहीर करेन. तुम्हालाही पुरावे देईन आणि शरद पवार यांनाही पुरावे देणार आहे. ज्यावेळी मी पुरावे देईल. ते पुरावेच असे असतील की त्याची चौकशी करावीच लागेल, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नीरज गुंडेंच्या मुद्द्यावरूनही मलिक यांना घेरलं. मलिकांनी मुख्यमंत्र्यांसोबत गुंडेंबाबत चर्चा केली पाहिजे. नीरज गुंडे आमचे संबंधित याहेत. शंभर टक्के आहेत. त्यांनी एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की मी जेवढ्या वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेलेले आहेत. मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा अधिक वेळा गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. कदाचित माझ्याआधीपासून त्यांचे मातोश्रीशी संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांशी संबंध आहेत मलिकांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे. आम्हाला नाही. आम्हाला गरजही पडत नाही, असं त्यांनी सांगितलं.
माझी पत्नी सोशल फिल्डमध्ये काम करत आहे. माझ्यावर हल्ला करत नाही म्हणून पत्नीवर हल्ला केला जात आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही मर्यादेचं उल्लंघन करणार नाही. पण उत्तर तर देऊ. माझे गुंडेंशी संबंध आहे. त्याविरोधात आरोप काय त्याच्याशी एकही केस नाही. ते एनसीपीचे गुन्हे बाहेर काढतात. हिंमत असेल तर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करा. आम्हाला मांडवली करावी लागत नाही. आम्ही चर्चा करतो. मलिकांसारखे लोकं मांडवली करताता. त्यांच्यासाठी पर्सनल प्रकरण म्हणून त्यांनी वानखेडेंना टार्गेट केलं आहे. त्यावर तेच उत्तर देतील. बोलण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मलिक यांच्याविरोधात क्रिमिनल डिफेमेशन करण्याचा विचार करणार असल्याचंही सांगितलं.
मलिकांवर यापूर्वीही आरोप झाले होते. त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाचा रिपोर्ट पाहा. न्यायाधीशांनी त्यांचा खोटेपणा उघड केला होता. तो त्यांचा इतिहास आहे. जे आतापर्यंत बाहेर आलं नाही, ते आता मी बाहेर काढणार आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. मी ईंट का जवाब पत्थर से देतो, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
‘फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीसमोर प्रकटले’, चंद्रकांत पाटलांचा टोला
VIDEO: हमाम में सब नंगे है, आमच्याही हातात दगड असू शकतात, संजय राऊत यांचा विरोधकांना इशारा
(Expose “After Diwali”: Devendra Fadnavis Hits Back At Nawab Malik)