यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नववी पास तरुणाने टाकला बनावट नोटांचा छापखाना, लाखो रुपयांच्या नोटा आणल्या चलनात

| Updated on: May 18, 2024 | 7:34 AM

Mumbai Crime News: आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता. त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार सुरु केला. त्याने काही नोटा वापरल्या आहे. त्याच्या नोटासंदर्भात एका दुकानदारास संशय आला. त्याने पोलिसांनी माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला.

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून नववी पास तरुणाने टाकला बनावट नोटांचा छापखाना, लाखो रुपयांच्या नोटा आणल्या चलनात
नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा अन् अटक केलेला आरोपी.
Follow us on

मोबाईल सर्वांच्या हातात आल्यानंतर कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यूट्यब आणि गुगलवर माहितीची खजीना मिळतो. एका नवीन पास असलेल्या २६ वर्षीय तरुणाने गजबचे काम केले. त्या तरुणाने यूट्यूबवर नोटा छापण्यासंदर्भातील व्हिडिओ पाहिले. त्यानंतर स्वत:च बनावट नोटा टाकण्याच्या कारखाना टाकला. लाखो रुपयांच्या नोटा त्या तरुणाने चलनात आणल्या आहे. प्रफुल्ल पाटील असे त्या तरुणाचे नाव असून नवी मुंबई पोलिसांनी त्याला तळोजा परिसरातून अटक केली आहे.

सापळा रचत अटक

नवी मुंबईतील तळोजा परिसरात प्रफुल्ल पाटील (२६) हा तरुण राहतो. त्याचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले आहे. तो बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पाटील याने यूट्यूबवर व्हिडिओ बघून आणि माहिती घेत या नोटांची छपाई केली. संगणक व प्रिंटरचा वापर करत त्याने या नोटा छापल्या.

पोलिसांना मिळाल्या बनावट नोटा

नववीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलीस हादरले. पोलिसांना माहिती मिळाल्यावर मध्यरात्री धाड टाकली. त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. त्याच्या जवळ आणि घरात एकूण 2 लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.

हे सुद्धा वाचा

10,20,50,100 आणि 200 रुपयांचा नोटा

प्रफुल्ल पाटील याच्याकडून आतापर्यंत 10,20,50,100 आणि 200 रुपयांचा एकूण 1443 बनावट नोटा हस्तगत केल्या. गेल्या चार महिन्यांपासून तो नोटा छापून चलनात आणत होतो. परंतु त्याची माहिती पोलीस यंत्रणेस मिळाली नाही. आतापर्यंत लाखो रुपयांच्या नोटा त्याने चलनात आणल्या आहे. एकूण किती नोटा चलनात आल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.

असा उघड झाला प्रकार

प्रफुल्ल पाटील याने पोलिसांना सांगितले की, आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसांपासून वेगळा राहत होता. त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार सुरु केला. त्याने काही नोटा वापरल्या आहे. त्याच्या नोटासंदर्भात एका दुकानदारास संशय आला. त्याने पोलिसांनी माहिती दिली आणि प्रफुल्ल पाटील याचा बनावट नोटांचा भांडाफोड झाला.