ठाणे : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद झाला होत आहेत. हा वाद हाणामारीपर्यंत जात आहे. परंतु आता शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. भाजप कार्यकर्त्यास अटकही झाली होती. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. एका फेसबुक पोस्टमुळे हा वाद झाला आहे.
नेमके काय झाले
ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्टवरून बुधवारी वाद निर्माण झाला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही पोस्ट भाजप कार्यकर्ता प्रमोद चव्हाण यांनी केली होती. या प्रकरणात चव्हाण याला अटक करण्यात आली होती.
पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
यानंतर शिवसेना नाशिक संपर्कप्रमुख संजय बच्छाव यांनी भाजप कार्यकर्ता प्रमोद चव्हाण यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रमोद चव्हाण अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी आनंद नगर परिसरात गस्त सुरू केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फेसबुक पोस्टमुळे घडला प्रकार
कार्यकर्त्यांना नोकरी आणि कामाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अद्याप एकही आश्वासन पूर्ण केले नाही, अशी पोस्ट भाजपचे कार्यकर्ते प्रमोद चौहान यांनी फेसबुकवर टाकली आहे. सोबतच आक्षेपार्ह शब्दही लिहिण्यात आले. यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला.