मुंबई : आता मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयाच्या (Autonomous college) अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहेत. याबाबत मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे (Sonali Rode) यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील (Mumbai division) स्वायत्त महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना रोडे म्हणाल्या की, मुंबईतील अनेक स्वायत्त महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविद्यालयाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मुंबई विद्यापीठांतर्गंत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. मग आमच्याच परीक्षा ऑफलाईन का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला होता. तशा अनेक तक्रारी देखील उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र हे महाविद्यालये स्वायत्त असल्यामुळे त्यांना आदेश देता येत नव्हता. या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात या संदर्भात स्वायत्त महाविद्यालयांना पत्र पाठवण्याचे निर्देश दिले होते. सामंत यांच्या निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवण्यात आल्याचे रोडे यांनी सांगितले.
मुंबई विभागातील सर्वच स्वायत्त महाविद्यालयांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेजच्या परीक्षा या ऑनलाईन होणार आहेत. माग आमच्याच परीक्षा ऑफलाईन का असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्यास व आमच्या ऑफलाईन परीक्षा झाल्यास आम्हाला मार्क कमी पडण्याची शक्यता आहे, हा आमच्यावर अन्याय होईल तसेच मार्क कमी पडल्यामुळे आम्हाला हवे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची भीती देखील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान या प्रकरणी विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयांना ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षेचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
SSC Exams | मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑनलाइन, काय आहे नेमकं कारण?
Mumbai Megablock: मुंबईकरांनो, रविवारचं लोकलचं वेळापत्रक बघितलं का? 8 तासाचा मेगाब्लॉक