संजय राऊत अडचणीत, धमकीप्रकरणी खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल

| Updated on: Feb 23, 2023 | 9:18 AM

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आपणास मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला होता. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी राजा ठाकूर याला दिल्याचेही सांगितले होते. यामुळेच ते अडचणीत आले.

संजय राऊत अडचणीत, धमकीप्रकरणी खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल
Follow us on

ठाणे : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला होता.  या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही पत्र दिले होते. त्यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. पण आता या आरोपानंतर संजय राऊत अडचणीत आले आहे. त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणती आहेत कलमे

संजय राऊत यांनी समाजामध्ये व गटा-गटामध्ये द्वेषाची भावना तेढ व वैमनस्य निर्माण करण्याचे कृत्य केले. समाजातील शांतता भंग केली. अपमानित शब्द वापरे, तसेच खोटे पत्र पोलीस आयुक्त मुंबई व ठाणे यांना दिले, असे मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. त्या तक्रारीवरुन संजय राऊत यांच्यांवर कलम २११, १५३ (अ), ५००, ५०१, ५०४, ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण


संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आपणास मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला होता. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी राजा ठाकूर याला दिल्याचेही सांगितले आहे. खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही त्याबाबत पत्र दिले होते. तसेच माध्यमांनाही त्याची माहिती दिली होती. त्यांच्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे.

खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी म्हटले आहे की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपली सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यावेळीही मी सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांना सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कशी होणार याकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजकारण तापले

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केल्यानंतर आता राजकारण प्रचंड तापले होते. त्याचबरोबर त्यांनी आपली सुपारी राजा ठाकूर याला दिल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे राजा ठाकुरचीही चौकशी केली जाणार का असा सवाल होत होता. परंतु ठाणे पोलीस बुधवारी नाशिकला गेले होते. त्याठिकाणी त्यांना संजय राऊत यांचा जबाब घेतला.