मुंबई : पवईतील म्हाडा कॉलनीत एका रहिवासी इमारतीला आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत (Fire breaks out at powai mhada colony building).
पवईतील हिरापन्ना मॉलसमोर म्हाडा कॉलनी आहे. या म्हाडा कॉलनीतील एनटीपीसी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर एका घरात भीषण आग लागली. ही आग वाढत गेली. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या या इमारतीतील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
आग वाढली तर अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल होतील. दरम्यान आगीचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमधून आगीची भीषणता स्पष्टपणे दिसत आहे (Fire breaks out at powai mhada colony building).
Breaking : मुंबईच्या पवई येथील एका रहिवासी इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल #MumbaiFire #Fire https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/NwPtoXzl6h
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020