मुंबई : मुंबईतील एलआयसीच्या इमारतीला आग लागण्याचं सत्र सुरुच आहे. मुंबईमध्ये वर्षभरात दुसऱ्यांदा एलआयसीच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई शहरातील एलआयसीच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत सुदैवाने कोणालाही जखमी झालेलं नाही. मात्र आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मुंबईतील गिरगावमधील एलआयसी बिल्डिंगला ही आग लागली आहे. एलआयसी इमारतीवरील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. दरम्यान याबाबत सविस्तर माहितीची प्रतिक्षा आहे.
मुंबईतील एसआयसी बिल्डिंगला आग
Maharashtra | Fire breaks out on the second floor in LIC Building in Girgaon, Mumbai. No injuries/casualties reported yet. Details awaited.
— ANI (@ANI) February 9, 2023
दरम्यान याआधी 7 मे 2022 रोजी विलेपार्ले येथील एलआयसी कार्यालयाला आग लागली होती. शनिवारी 7 मे 2022 रोजी सकाळी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. ही आग दुसऱ्या मजल्यावरील वेतन बचत विभागात ही आग लागली होती.