Special Report : गोळीबार  सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून?, बॅलेस्टिक अहवालात नेमकं आहे तरी काय?

| Updated on: Jan 13, 2023 | 12:24 AM

गोळीबार केलाच नसल्याचं सदा सरवणकर म्हणतात. बॅलिस्टिक अहवालात सरवणकर यांच्या बंदुकीचा उल्लेख असेल, तर सरवणकर यांच्या अडचणी वाढू शकतात.

Special Report : गोळीबार  सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून?, बॅलेस्टिक अहवालात नेमकं आहे तरी काय?
Follow us on

मुंबई : दादरच्या पोलीस (Dadar Police) स्टेशन परिसरात झालेला गोळीबार हा सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्या बंदुकीतून झाल्याचा अहवाल बॅलेस्टिक सुत्रांकडून दिल्याचं समजतं. गेल्या वर्षी ठाकरे गटासोबत वाद झाला होता. त्यानंतर प्रकरण दादरच्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलं. त्याच ठिकाणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांची रिव्हाल्व्हर जप्त केली. काडतूस आणि रिव्हॉल्व्हर फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. आता गोळीबार सरवणकरांच्याच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचं बॅलिस्टिक अहवालात स्पष्ट झाल्याचं कळतंय.

 

संपूर्ण अहवाल हाती आल्यावरच बोलणार असं सदा सरवणकर म्हणाले. मला आपल्याकडूनचं कळते. मी अहवाल बघेन. सत्यता पडताळेन नंतर आपणाशी बोलेन. कारण अद्याप तसा काही रिपोर्ट माझ्याकडं आलेला नाही. सत्यता पडताळल्याशिवाय बोलणं काही उचित नाही. बातम्यांवर बोलण योग्य होणार नाही. जेव्हा कळेल तेव्हा बोलेन, असं सरवणकर यांनी सांगितलं.

कायदेशीर कारवाई करा

आता सरवणकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. पोलिसांकडे आम्ही अर्ज देणार आहोत. अहवाल आलाय, तर कायदेशीर कारवाई करा. आमदार असले म्हणून काय झालं. नियम सर्वांना सारखेच असतात ना.

सर्वांसाठी सारख्या कलमा आहेत. त्यामुळं योग्य त्या कलमा लावाव्यात. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर वरिष्ठांना सांगणार आहोत. नेत्यांना सांगून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचं सरवणकर यांच्या विरोधक म्हणाले.

होम डिपार्टमेंटवर विश्वास

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला माहिती नाही. पण, माझा होम डिपार्टमेंटवर विश्वास आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी पक्षपात करू नये. भाजपाकडे छान वॉशिंग मशिन आहे. विरोधात असला की तो वाईट असतो. भाजपात गेला की, वॉशिंग मशिनमध्ये साफ होतो.

सदा सरवणकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. पण, गोळीबार केलाच नसल्याचं सदा सरवणकर म्हणतात. बॅलिस्टिक अहवालात सरवकर यांच्या बंदुकीचा उल्लेख असेल, तर सरवणकर यांच्या अडचणी वाढू शकतात.