First box of kesar mango in Mumbai:दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिना आला म्हणजे खव्वय्यांना आंब्याचे वेध लागते. मुंबई, पुण्याच्या बाजारात या महिन्यात पहिली पेटी दाखल होती. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून आंबे मिळण्यास सुरुवात होतात. आता नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील आंबा सोमवारी दाखल झाला आहे. यंदा पावसामुळे आंबा उशिराने आला आहे. त्याचा परिणाम आंब्याचा हंगाम फेब्रुवारी ऐवजी मार्चमध्ये सुरु होणार आहे. आंब्याची पहिली पेटी दाखल झाल्यानंतर त्याची पूजाही करण्यात आली.
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कोकणातील पहिला आंबा दाखल झाला आहे. कोकणातील देवगड येथून केसर आंब्याची पेटी दाखल झाली आहे. यंदा पावस चांगला झाला. सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. त्यानंतर अवकाळी पाऊस झाला. यामुळे बाजारात आंबा उशिराने दाखल झाला आहे. त्याचा परिणाम यंदा आंब्याच्या हंगामास उशीर होणार आहे. दरवर्षी फ्रेबुरवारीमध्ये आंब्याचा हंगाम सुरु होतो. यंदा मार्चमध्ये हा हंगाम सुरु होणार आहे.
कोकणातील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्यास नाही. यंदा हापूस आंब्या ऐवजी केशर आंब्याने हंगामाची सुरुवात झाली. आंब्यामध्ये हापूस आणि केसर आंब्यांना मोठी मागणी असते. आता देवगड येथील केसर शेतकऱ्याने विक्रीसाठी मुंबईत आणला आहे. २०२५ च्या हंगामातील केसर आंब्याची ही पहिली पेटी आहे. त्यामुळे त्याची पूजाही व्यापाऱ्यांनी केली.
कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या शेतातील हे आंबे आहेत. या पेटीला १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही पहिली आंब्याची पेटी कोण घेतो? त्या आंब्यास किती दर देणार? याकडे आंबे प्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबईत आंबे दाखल झाल्यानंतर पुण्यातील बाजारपेठेतही लवकरच यंदाच्या हंगामातील पहिली पेटी दाखल होणार आहे.