मुंबई: सहायक निरीक्षक सचिन वाझें भोवतीचा फास आणखीनच आवळला गेला आहे. वाझेंच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडतुसे घरात का ठेवली होती? याचे उत्तर वाझे देत नसल्याचं एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे. त्यामुळे वाझेंकडे ही काडतुसे आली कुठून? आणि त्यांनी ही काडतुसे का ठेवली आहेत? याबाबतचं गूढ वाढलं आहे. (Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare)
सचिन वाझेंची आज कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. सचिन वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.
तपासात सहकार्य नाही
यावेळी एनआयएने सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्याशिवाय वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आरोपीने 12 लाख रूपये दिले होते. त्याचीही माहिती घ्यायची असल्याचं एनआयएने कोर्टात सांगितलं आहे. याशिवाय वाझेंच्या आवाजाचे नमुनेही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे.
क्लोरोफार्मने बेशुद्ध केले?
दरम्यान, हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare)
VIDEO : Special Report | दहशतवाद्यांच्या कॅटेगरीत सचिन वाझे?https://t.co/zYk1Rded47#SachinVaze #NIA #UAPAact #ATS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर
मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा
सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी
(Found 62 Bullets From Arrested Cop’s House: NIA In Ambani Bomb Scare)