ही शान कोणाची, लालबागच्या राजाची! भक्तांकडून तब्बल ‘इतके’ कोटी रोख रुपये बाप्पाच्या चरणी अर्पण

| Updated on: Sep 20, 2024 | 6:51 PM

लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भक्तांकडून कोट्यवधी रुपये अर्पण करण्यात आले आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदात पूर्ण झाली आहे.

1 / 5
नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यभरातून आणि देशभरातून भाविक दरवर्षी येतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात.

2 / 5
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आपल्याकडून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून काहीतरी पैसे किंवा सोने, चांदीचे दागिने मनोभावे बाप्पाच्या चरणी अर्पण करतात. काही भाविकांकडून गुप्त दान केलं जातं. तर काही भाविकांकडून सोने, चांदीचे आभूषण दिले जातात. तर काही भाविकांकडून दानपेटीतून पैसे अर्पण केले जातात.

3 / 5
भाविकांची लालबागच्या राजावर असणारी भक्ती आणि प्रेम याची कशासोबतही तुलना करता येणार नाही. कारण बाप्पा देतो तर भरपूर देतो, अशी भाविकांची भावना असते. याशिवाय लालबागच्या राजादेखील नवसाला पावतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे लालबागच्या राजाला भरभरून दान केलं जातं.

4 / 5
दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदात केली जाते. यावर्षी देखील मंडळाकडून भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदात पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी भाविकांनी गणेशोत्सवातील 10 दिवसात लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख रुपये दान केले आहेत.

5 / 5
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी असते. मोठमोठे सेलिब्रेटी बाप्पाचं दर्शन गेण्यासाठी इथे येतात. गर्दीमुळे काही भाविक अनेकदा चरण स्पर्श न करता मुख दर्शन घेऊन निघून जातात. तसेच जे भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचू शकत नाहीत ते भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत बाप्पाला वंदन करतात.