देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयांवर विश्वास दाखवण्यासाठी सेंट जॉर्जमध्ये दाखल: गिरीश महाजन

| Updated on: Oct 25, 2020 | 4:48 PM

देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती स्थिर असून ते सरकारी रुग्णालयावरील विश्वास वाढावा म्हणून सेंट जॉर्जमध्ये दाखल झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. Girish Mahajan Said Devendra Fadnavis health condition is stable

देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयांवर विश्वास दाखवण्यासाठी सेंट जॉर्जमध्ये दाखल: गिरीश महाजन
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. (Girish Mahajan Said Devendra Fadnavis health condition is stable)

कोरोना संसर्ग झाला तर सरकारी रुग्णालयात दाखल करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारमधील कोरोना संसर्ग झालेले मंत्री खासगी आणि कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. कोरोना रुग्णसंख्या जास्त असताना सरकारी रुग्णालयांवर विश्वास दाखवणं गरजेचे होते. त्यामुळे फडणवीस यांनी ते वक्तव्य केले होते, असं गिरीश महाजन म्हणाले.

आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पॅरोमीटर वर खाली होत आहे. मात्र, फडणवीस यांना शुगर असल्यामुळे थोडी अधिक काळजी घ्यावी लागते, असं गिरीश महाजन म्हणाले.

डॉ. तात्याराव लहाने आणि इतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार केले जात आहेत. ते सध्या कोणतेही काम करत नसून आराम करत असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच शनिवारी ट्विट करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस बरे व्हावेत यासाठी तुळजाभवानीकडे प्रार्थना, सरकार त्यांची काळजी घेईल : संजय राऊत

Devendra Fadnavis Corona | देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग

(Girish Mahajan Said Devendra Fadnavis health condition is stable)