राज ठाकरे यांनी आज मनसेचे वरळीचे उमेदवार संदिप देशपांडे यांच्या प्रचारासाठी वरळीत सभा घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘संपूर्ण शहराचा विचका झाला आहे. कोणाचं लक्ष्य नाही. मागे रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता. आझाद मैदानावर त्यांनी चॅलेनच्या ओबी व्हॅन फोडून टाकल्या. पोलीस भगिणीवर हात टाकले. त्या मोर्च्याच्या विरोधात कोणीही उठले नाही. फक्त मनसेने मोर्चा काढला. त्यावेळी एक कमिश्नर होते. ते सांगत होते ते काहीही करतील पण तुम्ही हात नाही उचलायचा. मग दांडके कशाला दिलेत गरबा खेळायला.’
‘एकदा सत्ता द्या नाही यांना सडकून काढले तर सांगा. मौलवी फतवे काढताय बघा काय वेळ आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले माहितीये सगळ्यांना. काही विचारधाराच राहिलेली नाही. सगळ्यांनी अब्रु बाजुला ठेवल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरचं बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकले होते. काही होर्डिंगवर तर जनाब बाळासाहेब ठाकरे आलं. आज ते हयात असते तर एकेकाला फोडून काढले असले. त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मौलाना फतवा काढताय.
‘सगळ्या मुस्लिमांनी एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या पारड्यात मत टाकावी. सत्ता हातात दिल्यावर पहिल्या ४८ तासाच्या हातात सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून टाकेल. तुम्ही शांत बसता, थंड बसता, रागावत नाहीत म्हणून ही माणसं शेफारली. तुमची मतं विकली गेली. ज्यांच्यावर विश्वास टाकला ते दुसऱ्यासोबत निघून गेले. कोणाला लाज नाही.’
‘मराठमोळा हा वरळीचा भाग. पोलीस कॉलनी, बीडीडी चाळीत मराठी माणसं राहत आहेत. तुम्ही हक्काने सांगितले पाहिजे. आम्हाला या गोष्टी हव्यात. जगात गोष्टी घडू शकतात पण महाराष्ट्रात का नाही घडू शकत. तुम्ही बोललं पाहिजे. लोकांना सांगितले पाहिजे.’
मी ज्या गोष्टी माझ्याकडून होणाऱ्या आहेत त्याच गोष्टींचा शब्द देतो. आज ही मुंबई नुकती महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाचं नाक आहे. काय आहे आता परिस्थिती बघा. आज दिसत असलेली सगळी मैदान ब्रिटिशांच्या काळातली आहेत. याचं डिझाईन ब्रिटिश काळातील आहे. १९४७ नंतर एकही नवीन मैदान आले नाही मुलांना खेळायला. शहर कसं उभं करायचं हे नगरसेवक आणि आमदाराचं काम असतं.
नाशिकमध्ये जे काम केलं. रस्त्यावर खड्डे नव्हते. पत्रकार सांगायचे खड्डे नाहीत कोणते फुटेज पाठवू. जर नाशिकमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही होऊ शकत. महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. १०० टक्के नोकरी देण्याची हमी मी देतो. त्यातून उरल्या तर इतराना देऊ.