खुशखबर ! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हर फ्लो
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणातून पाणी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे तुळशीनंतर आता तानसा धरण ही ओव्हर फ्लो झाले आहे.