गोपीचंद पडळकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना ‘राजधर्मा’ची आठवण; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Nov 17, 2023 | 11:11 AM

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वादळ उठलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर सभा सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी जालन्यातील अंबडमध्येच महारॅलीचं आज आयोजन केलं आहे. सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेरलं गेलेलं असतानाच आता धनगर समाजानेही सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण; व्हिडीओ व्हायरल
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे ओबीसी समाजाने जालन्यातील अंबडमध्ये महारॅलीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सरकार चोहोबाजूने घेरलेलं असतानाच आता धनगर समाजानेही दंड थोपाटले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर आरक्षणावरून आव्हान दिलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्याने पडळकर यांनी हे आव्हान दिलं आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती.

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही, अशी आठवण गोपीचंद पडळकर यांनी करून दिली आहे. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे, अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

 

महायुतीकडून निराशा

आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल, ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, महायुतीककडूनही पदरी निराशा पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

हा इशारा देत आहे

समित्या गठित करूण धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धगनर समाजाच्या संवैधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.