राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांच्या भेटीला

| Updated on: Jun 16, 2020 | 6:21 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांची भेट घेतली.  ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी  आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांच्या सांत्वनासाठी राज्यपालांनी कलानगर येथील घरी जाऊन ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

राज्यपालांनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पाटणकर कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन माधव पाटणकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे काल (15 जून) मुंबईत निधन झाले. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) कला नगर येथील डल्लास इमारतीत दाखल झाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी वांद्रे येथील ठाकरे-पाटणकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली (Governor Bhagat Singh Koshyari).

प्रसिद्ध उद्योजक माधव पाटणकर यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र काल (सोमवार 15 जून) त्यांचे निधन झाले.

रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे आहे. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

संबंधित बातमी :

Madhav Patankar Dies | रश्मी ठाकरे यांना पितृशोक, माधव पाटणकर यांचे निधन