मुंबई : मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौत्के चक्रीवादळात बॉम्बे हाय येथे पी-365 तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंगळवारी (20) राजभवन येथे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. (Governor honors naval officers for saving hundreds of lives in Cyclone Tauktae)
आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा आणि आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचवले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.
राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी केली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.
17 मई को चक्रवात तौक्ते के कोर्स के दौरान बॉम्बे हाई से पी 365 ऑफ बाम्बे हाई से बर्ज करने के लिए सैकड़ों लोगों की जान बचाने में अनुकरणीय साहस दिखाने के लिए अधिकारियों और उनकी टीमों को धन्यवाद किया| (2/2) pic.twitter.com/Aw2tgmo38e
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) July 20, 2021
इतर बातम्या
Pegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप
मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा; जयंत पाटलांच्या सूचना
(Governor honors naval officers for saving hundreds of lives in Cyclone Tauktae)