मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर राज्यात एकामागून एक केसेस दाखल होत आहेत. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांना (St Worker Protest) भडकवल्याचा, कट रचल्याचा आणि पैसे उकळल्याचा असा गंभीर आरोप सदावर्तेंवर आहे. त्यावरूच आता सदावर्तेंचा कोठडी मुक्काम आणि कोर्टवाऱ्या सुरू आहेत. मात्र अशात आता बार काऊन्सिलकडेही सदावर्तेंची सनद रद्द करण्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. वकिल गुणरत्न सदावर्तेंविरोधात महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली, असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सदावर्ते ज्या वकीलीमुळे एवढे फेसम झाले ती वकीलच आता धोक्यात आलीय का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत बोलताना असीम सरोदे म्हणाले, वकील कायद्यातील 24 A सेक्शननुसार गंभीर गैरवर्तणूक आणि वकिली पेशाशी अप्रामाणिक तसेच फसवणूक केली असेल तर कारवाई होऊ शकते. सेक्शन 36 नुसार अनुपालन समिती निर्णय घेऊ शकते. अशा प्रकरणात दोन वर्षापर्यंत वकिली सनद निलंबित केलं जाते. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगिली आहे. तसेच गुणरत्न सदावर्तें यांच वर्तन वकिली पेशाशी सुसंगत नाही, अशी टीकाही आता होऊ लागली आहे,. त्यामुळे बार कौन्सिलकडून सदावर्तेंवर दोन वर्ष निलंबनाची कारवाई होणार का? असा सवाल विचार
गुणवंत सदावर्ते यांनी कायदेशीर दायित्व नसताना करोडो रुपये जमा करून कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणे बाबत मी अकोट पोलिस स्टेशन अकोला जिल्ह्यामध्ये तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती एका एसटी कर्मचाऱ्यांने दिली आहे. तक्रारदार विजय मालोकार यानी पोलीस स्टेशनला हे तक्रार दाखल केलेली आहे .त्याचा पुरावा असा की अजय गुजर यांचे वकील गुणवंत सदावर्ते आहेत. त्यांना 74 हजार चारशे रुपये अकोट डेपो मधून पाठवल्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तसेच 244 कर्मचाऱ्यांचे 74 हजार चारशे रुपये त्यांना पाठवण्यात आलेले आहेत. या तक्रारीची दखल अकोट पोलीसांनी घेत जयश्री पाटील आणि गुणवंत सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.