Gunaratna Sadavarte | ‘ओपनमधून मराठा भाऊ येणार, तोच मराठा भाऊ पुन्हा….’, आता काय म्हणाले गुणरत्ने सदावर्ते

| Updated on: Nov 04, 2023 | 2:57 PM

Gunaratna Sadavarte | "आपण कमिटी बनवतो, तेव्हा तटस्थ असलं पाहिजे. आपण विशिष्ट समाजासाठी काम करण्यासाठी, विशिष्ट समाजाचे न्यायाधीश देऊ लागलो" गुणरत्ने सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलय?. 'सरकार मी सुतार, लोहार, ब्राह्मणांचा आवाज आहे'

Gunaratna Sadavarte | ओपनमधून मराठा भाऊ येणार, तोच मराठा भाऊ पुन्हा...., आता काय म्हणाले गुणरत्ने सदावर्ते
Gunaratna Sadavarte
Follow us on

मुंबई (निवृत्ती बाबर)  : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी आरक्षणाची भूमिका होती. त्यांचं जे शेवटच भाषण होतं, त्याचा सर्वाना विसर पडला का?. प्रभू रामचंद्राच्या विचारातला आपला हिंदुस्थान, त्यांच्या राम राज्यातला विचार आपण मागे टाकत चाललोय का?” असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलाय. मराठा आरक्षणाला गुणरत्ने सदावर्ते यांचा विरोध आहे. “इतर मागासांसंदर्भात आरक्षणाची जी निती आहे, धोरण आहे, त्यात कोणीतरी उपोषण करतोय. प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. पण जे मागास नाहीत, त्यांना मागास ठरवण्याच्या भानगडीत पडत आहोत” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “एका गावात जे सुतार, लोहार, कुंभार आहेत. जे, जे कुणी बारा बलुतेदार असतील, ते कधीतरी मुख्य प्रवाहात यावेत, सरपंच दिसावेत. एक कोणतीही ग्रामपंचायत घ्या, ओपनमधून मराठा भाऊ येणार, तोच मराठा भाऊ ओबीसी, कुणबी म्हणून उभा राहणार. जात आपल्या डोक्यातून निघणार नाही. राजकारणातून जात निघून जाणार नाही. स्थानिक पातळीवर तुम्हाला कधी कुंभार नगराध्यक्ष म्हणून, सूतार सरंपच आणि लोहार जिल्हापरिषद अध्यक्ष दिसू शकणार नाही” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

“या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. डेड एन्ड आणू नका सरकार. सरकार हे तुमच्या विरोधात नाहीय. सरकार ही भावना आहे. सरकार तुम्ही एकाबाजूने ऐका. दुसऱ्याबाजूने थोडा विचार करा. गायकडवाड आयोगाने राजकारणात आरक्षण सांगितलं नव्हतं. त्यापुढे जाऊन आपण असं करायला लागलो, तर डेड एन्ड येईल सरकार” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “आधी मागास ठरवाव लागले. सरकार मी सुतार, लोहार, ब्राह्मणांचा आवाज आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, मराठा आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ते विहित पद्धतीत बसलं पाहिजे. संवैधानिक दृष्ट्या ते देता येत नाही, सारासार विचार करावा” अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी केली.

‘विशिष्ट समाजाचे न्यायाधीश’, काय म्हणाले गुणरत्ने सदावर्ते?

“मराठा आरक्षणासंदर्भात बनवलेल्या सबकमिटीने आरक्षणाच्या बाजूच्याच लोकांच ऐकू नये, आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांचही ऐकावं. आपण कमिटी बनवतो, तेव्हा तटस्थ असलं पाहिजे. आपण विशिष्ट समाजासाठी काम करण्यासाठी, विशिष्ट समाजाचे न्यायाधीश देऊ लागलो, ही परंपरा चांगली नाही. मला निवृत्त न्यायाधशींच्या समाजावर बोलायच नाहीय, ही पंरपरा चांगली नाही, जे कोणी विद्धान असतील, त्यांना आपण घ्यावं, पण विशिष्ट समाज म्हणून कोणत्याही न्यायाधीशाला काम देऊ नये. कोणाचा अवमान करण्याचा उद्देश नाही” असं गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.