मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा, IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

| Updated on: May 09, 2024 | 3:22 PM

Maharashtra Heatwave Warning: दोन दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते. यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरु झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे.

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा, IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
temperature increases in mumbai
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान ३८ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारी बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबई वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घामाच्या धारा निघत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सुरक्षेशिवाय उन्हात फिरु नका

मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवला. संध्याकाळनंतर तापमान कमी झाले नव्हते. महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यांसोबत देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यात गोवा, ओडिशामध्ये १५ आणि १६ एप्रिल रोजी हीट वेव असणार आहे. १७ आणि १८ रोजी तेलंगणामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. आंध्र प्रदेशात १६ ते १८ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षेशिवाय उन्हात फिरू नका

उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सुरक्षेशिवाय उन्हामध्ये बाहेर पडू नका, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

 

सतत पाण्याचे सेवन करा

उन्हामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी सतत पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे सर्वात महत्वाचे आहे.

उष्णतेची लाट कधी म्हणतात

दोन दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते. यंदाच्या हंगामात उन्हाळा सुरु झाल्यापासून गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेमुळे होणारे आजार, उष्माघात सारखे प्रकार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.