मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईत भांडुप, विक्रोळी, चेंबूर, चांदीवली या भागात दरड आणि भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु ही रक्कम कमी असून त्यात वाढ करून सांत्वनपर मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. (Help 10 lakhs to families of those who died in the landslide; RPI demand)
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी चेंबूरच्या भारतनगर येथील बीएआरसी ची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी रिपाइंचे संजय डोळसे, सुभाष साळवे, सोपानराव खंडागळे, संतोष कांबळे, विष्णू मस्के, प्रमोद इंगळे आदी उपस्थित होते.
वाशीनाका येथील भारत नगर मध्ये बीएआरसीची भिंत कोसळून 15 जण मृत्युमुखी पडले आहेत.विक्रोळी पंचशील नगरमध्ये 5 जण दरड कोसळून मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना रिपाइंतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली
मुंबईतील डोंगराळ भागातील झोपडीवासीयांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे अनेक वेळा मुंबई मनपाकडे केली गेली आहे. मुंबई मनपा मात्र पावसाळा आल्यानंतर जागी होती. झोपडीवासीयांकडे राज्य शासन आणि मुंबई मनपाने मानवतेच्या दृष्टीने पाहून झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे.
पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी दरड कोसळणे, भिंत कोसळणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यात आता आणखी दुर्घटना घडू नयेत, म्हणून राज्य सरकार आणि मुंबई मनपाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर
(Help 10 lakhs to families of those who died in the landslide; RPI demand)