मुंबईत हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? पिकनिकला आलात तर पाहूनच जा…

| Updated on: Nov 26, 2024 | 7:15 PM

मुंबई ही फक्त गेटवे ऑफ इंडिया आणि जुहू बीचपुरती मर्यादित नाही. या लेखात मुंबईतील काही अद्भुत, अपेक्षेपलीकडची ठिकाणे सांगितली आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हिरवाईपासून ते मरीन ड्राइव्हच्या रमणीय दृश्यांपर्यंत आणि खंडाळ्याच्या मनमोहक डोंगररांगांपर्यंत, मुंबईची खऱ्या अर्थाने ओळख करून देणारी. या ठिकाणांची भेट घ्यायला विसरू नका. या लेखातून तुमची मुंबईची सहल अधिक अर्थपूर्ण होईल.

मुंबईत हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? पिकनिकला आलात तर पाहूनच जा...
Follow us on

मुंबई हे जगाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. जगभरातील लोक मुंबई पाहायला येतात. मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानीच नाही तर ही स्वप्नांची नगरी आहे. या नगरीत अनेक तरुण-तरुणी उद्याची स्वप्न घेऊन येतात. आपणही काही तरी मोठे होऊ ही आशा उराशी बाळगून येतात. काही लोक तर घर सोडून येतात. तर काही लोक केवळ मुंबई फिरण्यासाठी येतात. मुंबईतील आयकॉनिक सिनेमा थिएटर, फिल्म स्टुडिओ, कलाकारांची घरे, उद्योजकांची घरे, प्रेक्षणीय स्थळे आणि चौपाट्या पाहण्यासाठी जगभरातील माणूस मुंबईत येत असतो. पण मुंबईतील काही खास गोष्टी पाहायच्या राहून जातात. मुंबई राहून जर त्या गोष्टी पाहिल्या नाही तर काहीच पाहिलं नाही, असं म्हणावं लागतं. या कोणत्या गोष्टी आहेत? कोणती स्थानं आहेत? यावरच आता आपण प्रकाश टाकूया.

निसर्गप्रेमींसाठीचं ठिकाण

देशात निसर्ग प्रेमींची काही मकी नाही. अनेकजण फिरायला जातात तेव्हा निसर्गाचं सानिध्य शोधण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतही असं ठिकाण आहे. त्या ठिकाणाला निसर्गप्रेमी जात नाही असं नाही. ते ठिकाण म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. इतर ठिकाणी शोधूनही सापडत नाहीत, अशी अनेक झाडे आणि वनस्पती या उद्यानात आहेत. याशिवाय, पार्कमधील हिरवाई पाहून प्रत्येकाचे मन मोहून जाते. तसेच, येथे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी देखील दिसतात, जे खूप खास आहेत.

गेटवे ऑफ इंडिया

मुंबईच्या आयकॉनिक ठिकाणांचा उल्लेख केला आणि गेटवे ऑफ इंडियाबद्दल सांगितलं नाही, असं होणं शक्य नाही. अरबी समुद्राच्या किनारी अपोलो बंदर किनाऱ्यावर असलेली ही इमारत ब्रिटिश राजाची आठवण करून देते. रोमन स्थापत्यशास्त्राच्या प्रभावाने बनवलेल्या 26 मीटर उंच प्रवेशद्वारातून विजयाचा गौरवाचा अनुभव मिळतो. त्यात हिंदू-मुस्लिम डिजाइन्सचा देखील सुंदर वापर केला आहे. येथे येणारे पर्यटक नौका, फेरी किंवा खासगी यॉटमध्ये फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. सूर्यास्तानंतरचं येथील दृश्य पाहण्यासारखं असतं.

मरीन ड्राइव्ह

मुंबईच्या नाइट लाईफबद्दल बोलायचं तर अनेक पब्स आणि बार्स मुंबईत आहेत. पण जो आनंद पार्टनरच्या सोबतीत मरीन ड्राइव्हवर चालताना मिळतो, तो दुसरा कुठेही मिळत नाही. सूर्यास्त आणि रात्रीचा वेळ, दूरवर पसरलेला समुद्र आणि ताज्या हवेमुळे मिळणारी शांती इतर कुठेही अनुभवता येत नाही. रात्रीच्या वेळी मरीन ड्राइव्हवर असलेल्या वळणदार रस्त्यावरील स्ट्रीट लाइट्स इतक्या सुंदर दिसतात की त्याला ‘क्वीन्स नेकलेस’ असंही म्हणतात.

जुहू बीच

मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती जुहू बीचवर जातोच जातो. मुंबईतील सर्वात खास बीच म्हणूनही जुहू बीचकडे पाहिलं जातं. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्याही आकर्षणाचं केंद्र जुहू बीच आहे. त्याचं कारण म्हणजे जुहू चौपाटी अनेक सिनेमात दाखवलेली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्यांना एखाद्या कलाकाराची जुहू बीचवर भेट होईल असं वाटतं. त्या ओढीने अनेकजण जुहू बीचला येतात. या ठिकाणचं चटपटं स्ट्रीट फूड तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेही लोक जुहू बीचवर येतात.

खंडाळा

मुंबईपासून साधारणपणे 82 किलोमीटर दूर असलेल्या खंडाळ्याचं नाव तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं असेल. खंडाळ्याच्या सुंदर डोंगराळ प्रदेशाचे दृश्य तुम्ही चित्रपटात पाहिलेच असेल. जर तुम्ही मुंबईत आलात तर मुंबईपासून जवळच असलेल्या खंडाळ्याला भेट द्या. तुम्ही खंडाळ्याला भेट दिली नाही तर तुमची ट्रिप पूर्ण झालीय असं म्हणता येणार नाही. हिरवं माळरान आणि छातीचा कोट करून उभी असलेली डोंगररांग तुम्हाला निश्चितच मोहून टाकेल.