एलिफंटाला जाणाऱ्या बोटीसोबत जी काही दुर्घटना झाली ती अतंत्य दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. इथूनपुढे पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी नक्कीच प्रशासनाकडूनही काळजी घेतली जाईल. तसं पाहायला गेलं तर एलिफंटा हे मुंबई जवळचे सर्वात लोकप्रिय प्रयटन स्थळ आहे. त्यामुळे मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा ही बोट सफारी बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे.
एलिफंटा लेण्यांबद्दल
मुंबईच्या अरबी समुद्राजवळ एका बेटावर एलिफंटा लेणी आहे. एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्यायच नाही. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते. गेटवे ऑफ इंडियाच्या पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर घारापुरी म्हणजेच लेण्यांचे शहर निर्जन बेट आहे. याच बेटावक एलिफंटा लेणी आहे.
साधारण 6व्या शतकात या बेटांचा उगम झाल्याचं सांगण्यात येतं. इतिहासकार आणि विद्वान मंडळीकडून मिळालेल्या माहितनुसार अंकीय पुरावे, स्थापत्य शैली आणि शिलालेखांवरून असे दिसून आले की गुहा मंदिरे 6व्या शतकाच्या मध्यात कलाचुरी वंशातील राजा कृष्णराजाची होती आणि बौद्ध स्तूप हीनयान बौद्धांचे होते.
घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. 1997 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला. एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
1534 मध्ये पोर्तुगीजांनी गुजरात सल्तनतीकडून जमीन ताब्यात घेतल्यावर, एलिफंटा सामान्य भाषेत आला आणि समुद्रावर लक्ष ठेवणाऱ्या एका मोठ्या खडकावरून आणि हत्तीच्या मूर्तीवरून त्याचे नाव देण्यात आले.
मुंबई ते एलिंफटा जाण्यासाठी किती वेळ लागतो?
गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीचे तिकीट 260 रुपये आहे. बोटीने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटाला जाण्यासाठी 60 मिनिटांचा म्हणजेच जवळपास एक तासांचा वेळ लागतो. दर 15 ते 30 मिनिटांनी गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठी बोट मिळते. दर, सोमवारी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद असते.
बोटींची तिकीट किती?
गेट वे येथून सकाळी 9 ते 09:30 वाजता एलिफंटासाठीची पहिली बोट सुटते. तर, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी शेवटची बोट दुपारी 3.30 वाजता सुटते. यामुळे 3.30 नंतर तुम्ही गेट वेला पोहचलात तरी तुम्हाला एलिफंटाला जाता येणार नाही. सुमारे एक तासात तुम्हाला एलिफंटा बेटावर घेऊन जाते. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटासाठी दर अर्ध्या तासाला एक फेरी आहे तसेच इथे पर्यटकांची गर्दीही प्रचंड असते तिकीटसाठी उशीर लागतो किंवा सरळसरळ तिकीट संपतात. त्यामुळे वेळेच नियोजन करूनच निघावं लागतं.
संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं
एलिफंटाहून 12 वाजता गेट वे ऑफ इंडियाडे येणारी पहिली बोट निघते. तर, एलिफंटाहून गेट वे ऑफ इंडियाला येणारी शेवटची बोट ही सायंकाळी 6.30 वाजताची आहे. यानंतर एकही बोट येथे येत नाही. यामुळे ही शेवटची बोट सुटल्यास पर्यटकांना एलिफंटा बेटीवर अडकून पडावं लागू शकते. यामुळे एलिफंटाला फिरायला गेल्यावर वेळेचे भान ठेवणं महत्त्वाचं आहे.
तिकिटांची किंमत किती
एलिफंटा बेटावर जाण्यासाठी तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया फेरी घ्यावी लागेल. दुतर्फा प्रवासासाठी फेरीचे भाडे सुमारे 150 रुपये आहे. भारतीय पर्यटकांसाठी एलिफंटा लेणीचे प्रवेश तिकीट 40 रुपये आहे. सार्क आणि बिमस्टेक देशांतील पर्यटकांसाठी एलिफंटा लेणींमध्ये प्रवेशासाठी तिकीटाची किंमत समान आहे. मात्र, एलिफंटा लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी परदेशी नागरिकांना 600 रुपये मोजावे लागणार आहेत. 15 वर्षाखालील मुलांसाठी स्मारक संकुलात प्रवेश विनामूल्य आहे.