बेळगावी: बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठं यश मिळवलं आहे. 36 जागा जिंकून भाजपने बेळगाव महापालिकेत बहुमत मिळवलं आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. बेळगाव महापालिकेवर एकीकरण समितीची सत्ता येईल असं वाटत होतं. मात्र, समितीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. समितीला अपयश का आलं? भाजपच्या विजयामागचं नेमकं सूत्रं काय? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (how maharashtra ekikaran samiti defeat in karnataka municipal election?)
बेळगावचा निकाल
बेळगाव महापालिकेच्या 58 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी भाजपने 36 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर एमआयएमने एक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने 4 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे बेळगाव महापालिकेत भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं आहे. बेळगाव महापालिकेत एकीकरण समिती सत्तेत होती. त्यानंतर महापालिका बरखास्त करण्यात आली. भाजपच्या या कारवाईचा निषेध म्हणून बेळगावमधील जनता पुन्हा एकदा एकीकरण समितीला विजयी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या निवडणुकीत एकीकरण समितीला अवघ्या तीन जागाच मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पराभवाची कारणं काय?
>> बेळगाव महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय पक्ष उतरले होते. राजकीय पक्षांचे नेते प्रचारात उतरले. त्यामुळे एकीकरण समिती त्यात कमी पडली.
>> भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी बेळगावात मराठी माणसांना मोठ्या प्रमाणावर तिकीट दिलं. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा फायदा भाजपला झाला.
>> राज्यात भाजप सत्तेत असल्याने मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला.
>> ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील आजारी आहेत. ते बेळगावला येऊ शकले नाही. त्यामुळे एकीकरण समितीच्या लोकांना एकत्र करण्यात समितीला अपयश आलं.
>> शिवसेनेचा एकही नेता प्रचारासाठी बेळगावात गेलान नाही. त्यामुळेही एकीकरण समितीत उत्साह भरता आला नाही.
>> भाजपने मराठी उमेदवार देतानाच विकासाचा आणि हिंदुत्वाचा मुद्दाही लावून धरला.
>> एकीकरण समितीने 58 जागांपैकी केवळ 21 जागांवरच उमेदवार दिले.
>> एकीकरण समितीतील अंतर्गत मतभेद शेवटपर्यंत संपले नाही
>> प्रभागांची पुनर्रचना झाल्याने त्याचाही फटका एकीकरण समितीला बसला.
>> आप आणि एमआयएमनेही जोरदार प्रचार केला. त्याचाही एकीकरण समितीला फटका बसला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले.
बेळगाव महापालिकेत प्रचारासाठी शिवसेना नेते का गेले नाही? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. आम्ही मुद्दाम गेलो नाही प्रचाराला. कारण या निवडणुकीला वेगळं वळण लागू नये म्हणून आम्ही गेलो नाही. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही तिथे गेलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बेळगाव महानगरपालिकेच्या 35 वर्षाच्या इतिहासात एक हाती सत्ता घेतली होती. त्यामुळेच काही अपवाद वगळता महापौरपदाचा मान मराठी माणसालाच मिळालाय. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीकडे यावेळी इच्छुकांची संख्या वाढली. याचा मेळ घालणं समितीच्या नेत्यांना अखेरपर्यंत जमलं नाही. एकीकरण समितीचे अवघे चारच उमेदवार निवडून आले. त्यामुळ समिती महापालिकेत प्रबळ विरोधक देखील होऊ शकली नाही, असं राजकीय विश्लेषक प्रसाद प्रभू यांनी सांगितलं. (how maharashtra ekikaran samiti defeat in karnataka municipal election?)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 September 2021https://t.co/AwWbqQL4k1#SuperFastNews #SuperFastNews100 #100SuperFastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2021
संबंधित बातम्या:
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप
Belgaum Municipal Election final result 2021 : महाराष्ट्र एकीकरण समिती हरली, भाजपचा मोठा विजय!
गणेशोत्सवानिमित्त भक्तांमध्ये मोठा उत्साह, नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या
(how maharashtra ekikaran samiti defeat in karnataka municipal election?)