महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मतदानासाठी आता अवघे 19 दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख संपली आहे. तसेच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी देखील झाली आहे. या छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. तर अनेक उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यानंतर येत्या 4 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुफान सभा गाजणार आहेत. संपूर्ण राज्य निवडणुकीच्या या रणधुमाळीने न्हाऊन निघणार आहे. पण त्याआधी आपण पाठिंबा देत असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे ना? ते जाणून घेणं आवश्यक आहे. मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघांसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. पण त्यापैकी केवळ 166 उमेदवारांचेच अर्ज वैध ठरले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे इतरांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती आज ११६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.