मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईत होते. मुंबईतील विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी मुंबईत आले होते. यावेळी मोठी जाहीरसभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. शिंदे-फडणवीस यांनी आपल्या भाषणातून ठाकरे कुटुंबावरच हल्लाबोल केला. खासकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सर्वाधिक हल्ला चढवला. त्यामानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण बॅलन्स ठेवलं. विरोधकांवर टीका करताना त्यांनी विकास, देश आणि मुंबई आदी मुद्द्यांनाही हात घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मिनिटे 06 सेकंद भाषण केलं. या भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वच विषयांना हात घातला. आपल्या स्टाईलने त्यांनी विकासावर भाष्य करतानाच विरोधकांवरही टीका केली.
मोदींनी आपल्या भाषणात विकास या शब्दाचा सर्वाधिक वेळा उल्लेख केला. आपल्या 25 मिनिटाच्या भाषणात मोदींनी एक दोन नव्हे तर तब्बल 10 वेळा विकास या शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी मुंबईचा उल्लेख सर्वाधिक वेळा केला. मोदींनी मुंबईचा उल्लेख 8 वेळा केला.
याच भाषणात मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वाधिक वेळा उल्लेख केला. मोदींनी शिंदे यांचा 6 वेळा उल्लेख केला. तर देवेंद्र फडणवीस यांचा 04 वेळा उल्लेख केला. मोदींनी फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांचा सर्वाधिक उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Memorable day for Mumbai! Speaking at launch of multiple development initiatives benefiting the citizens of this vibrant city. https://t.co/B5yy73uIYH
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2023
यावेळी मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकदाही उल्लेख केला नाही. पवारांचा उल्लेख करणं मोदींनी टाळलं. तर उद्धव ठाकरे यांचा अवघा दोनदाच उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांचा एकदाच उल्लेख केला.
शरद पवार यांचा उल्लेख टाळला असला तरी उमहाविकास आघाडीचा त्यांनी दोनदा उल्लेख केला. याच भाषणात मोदींनी भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेचा दोनवेळा उल्लेख केला. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा फक्त एकच वेळा उल्लेख केला.