मुंबई : मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटामध्ये तब्बल 13 स्थानिक आगीत होरपळून जखमी झाले. यामध्ये एका कुटुंबावर गंभीर परिस्थिती ओढावल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नघाई सुरू असलेल्या घरातील वडील आणि मुलगा आगीत 50 टक्के भाजल्याचं समोर आलं आहे तर नवरी मुलगी आणि तिची आई सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (huge explosion of cylinder in lalbagh bride is safe but her father and brother injured)
सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, स्थानिक मंगेश वसंत राणे (54) यांच्या घरात आज लेकीच्या हळदीचा कार्यक्रम होता. 9 तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न होतं. पण त्याआधीच कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. या भीषण स्फोटामध्ये नवरी मुलगी आणि आई वाचली असून पिता आणि मुलगा आगीत होरपळले आहेत. दोघेही 50 टक्के भाजले असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच होरपळलेल्या 13 जणांना पाहण्यासांठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात भेट घेतली तर स्थानिक आमदार अजय चौधरीही रुग्णालयात पोहोचले आणि घटनास्थळीही त्यांनी आढावा घेतला. यानंतर स्थानिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याची माहिती आहे.
नेमकी काय आहे घटना ?
दरम्यान, अनेक दिवसापासून हा खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक गेले असता अचानक स्फोट झाला. यामुळे परिसरातील तब्बल 13 स्थानिक आगीत होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (huge explosion of cylinder in lalbagh bride is safe but her father and brother injured)
या स्फोटामध्ये 3 महिला आणि 10 पुरूषांवर केईएम अतिदक्षता विभागात ऊपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमका गॅस लीक का होत होता? तर ही खोली कोणाची आहे? याकडे आधीच लक्ष का दिलं गेलं नाही? याचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या –
मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?
(huge explosion of cylinder in lalbagh bride is safe but her father and brother injured)